मुंबई - सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. काल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.