ETV Bharat / city

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना 'होमवर्क'; सर्व मतदारसंघात मनसेच्या सभा, मेळावे - राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

राज ठाकरेंनी काही काळ सुट्टीवर जाणार असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलाच मोठा होमवर्क दिला ( Raj Thackeray Guide MNS Party Worker ) आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray
author img

By

Published : May 28, 2022, 10:14 PM IST

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा धामधुमीच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याने काही काळ आराम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष काही काळ सुट्टीवर जाणार असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलाच मोठा होमवर्क दिला आहे. राज ठाकरे यांनी मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत त्यांनी हा होमवर्क दिला ( Raj Thackeray Guide MNS Party Worker ) आहे.

'राज्यभर सभा घ्या' - मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, 'ऑपरेशननंतर ते पूर्णपणे ठीक होईपर्यंत पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते महाराष्ट्रभर विधानसभा स्तरावर कार्यकर्ता परिषदा आणि जाहीर सभा घेतील. तसेच, कोणतीही व्यक्ती, कार्यकर्ता किंवा नेता फेसबुक सोशल मीडियावर कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात किंवा पक्षाने दिलेल्या अजेंड्या व्यतिरिक्त कोणत्याही काहीही पोस्ट करू शकत नाही.'

राज ठाकरेंच्या सहीचे सर्वांना पत्र - नांदगावकर पुढे म्हणाले की, 'अयोध्या दौरा रद्द केला म्हणजे पुन्हा जाणार नाही, असं अजिबात नाही. आम्ही अयोध्येला जाऊ. धनुष्यबाण चालवताना बाण पुढे जाण्यासाठी दोरी मागे खेचावीच लागते. येत्या एक-दोन दिवसांत सर्व हिंदू बंधू-भगिनींना भोंग्यांच्या मुद्द्यावर स्वतः राज ठाकरे यांच्या सहीचे एक पत्र दिले जाईल, जे मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये असेल.'

म्हणून तीनही भाषांमध्ये पत्र - 'आता हे मनसेचे नव्हे तर लाऊडस्पीकरच्या विरोधात जनआंदोलन उभे केले जाणार आहे. जेणेकरून लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याचा किंवा काढून टाकण्यासाठी जो दबाव आहे, तो कायम राहील. कोणत्याही राज्यात राहणार्‍या हिंदू बंधू-भगिनींना त्यांच्या भाषेत ते नीट समजावे यासाठी हे पत्र तिन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध केले जात आहे. आणि अधिकाधिक हिंदू बंधू-भगिनींना मनसेशी जोडण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोहीम राबवावी,' असे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. दरम्यान, मनसेच्या या रणनीतीचा नेमका मनसेला फायदा होतो की तोटा? हे आगामी निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.

हेही वाचा - Navneet Rana : नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाल्या, "महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाला..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.