मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा साक्षात्कार झाला, असे राज ठाकरे म्हणाले. प्रचारावेळी उद्धव ठाकरेंना कधी या गोष्टीची आठवण का झाली नाही. मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राचे आहे मग ती गोष्ट अमीत शहांबरोबर चार भींतीच्या आत केली, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
काय म्हणाले राज ठाकरे - यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'कोरोनामुळे सगळ्या गोष्टी विस्मरणात गेलं आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी जे घडलं ते पण आपण विसरलो आहे. अनिल अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवणारा वाझे एकेकाळी शिवसेनेत होता. देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली गाडी का ठेवली, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्ताला पदावरून हटवले जाते. ते आयुक्त गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचे आरोप लावतात. पण तुम्ही सगळं विसरता, याचाच फायदा हे लोक घेतात, असेही राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईवरूनही राज ठाकरे यांनी टीका केली. 'दाऊदशी संबंध असल्याचा आरोप एका मंत्र्यावर होतो आणि तो जेलमध्ये जातो', असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात आज अनेक प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळायला हवं, ते मिळत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.