मुंबई - शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर राज्य सरकार अस्थिर झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार उद्या ( 30 जून) बहुमत चाचणीसाठी विधानसभेत मतदान होणार आहे. विरोधकांची मते वाढविण्याच्या दृष्टीने भाजपाने रणनीती आखली आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader Of Opposition Devendra Fadnavis ) यांनी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात आपला आमदार मतदान करेल, याबाबत होकार दिला. विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार आहे.
हेही वाचा - Eknath Shinde on floor test : आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही-एकनाथ शिंदे
हेही वाचा - 'सामान्य माणूसही समजतो, की ही भाजपची खेळी आहे'- बाळासाहेब थोरात
हेही वाचा - Sanjay Raut : राफेल पेक्षा राज्यपालांचा स्पीड अधिक; संजय राऊतांचा कोश्यारींना टोला