मुंबई - उत्तर प्रदेश मधील निकालावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला होता. (Sanjay Raut criticizes PM Modi) यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव आणतोय असं होत नाही' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मी घाबरत नाही
"या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीत आम्ही जात आणत नाही. या तपास यंत्रणा पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, त्यांना आम्ही घाबरत नाही. आता मी तुमच्याशी बोलतोय इथून बाहेर पडल्यानंतर दहा मिनिटांनी जरी माझ्या घरावर धाड पडली तरीही मी घाबरत नाही. आमचे स्पष्टच मत आहे, तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. तपास यंत्रणा पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करत आहेत." असही राऊत यांनी म्हटले आहे.
पंजाबमध्ये भाजपचा दारुण पराभव
"उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये आमचा पराभव झाला आम्हाला निकाल मान्य आहे. पण, भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे. उत्तर प्रदेश गोवा ही त्यांचीच राज्य होती त्यांनी राखली यात काही नवल नाही. मात्र, एका राष्ट्रीय पक्षाचा पंजाब सारख्या छोट्याशा राज्यात दारूण पराभव होतो ही त्यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे."
भाजपला चिंतन करण्याची गरज
"या निकालाने हुरळून न जाता भाजपने चिंतन करण्याची गरज आहे. पंजाबमध्ये इतका वाईट पराभव का झाला? याचा त्यांनी विचार करावा. गोव्यात देखील त्यांचे दोन मुख्यमंत्री पराभूत झालेत, त्यांचे उपमुख्यमंत्री पराभूत झालेत ही वेळ त्यांच्यावर का आली याचा त्यांनी विचार केला पाहिजे." असही राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा - मुंबई मेट्रोने मालमत्ता कराचे ११७ कोटी थकवले, पालिकेकडून मालमत्ता जप्तीची नोटीस