मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी ही संततधार मुंबई उपनगरात दुपारपर्यंत कायम होती. पावसाचा जोर कमी झाला तरी पाण्याचा निचरा मात्र झाला नाही. यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घरात खुसले आहे.
मुलुंडच्या मिठागारांजवळच असलेल्या पाटकर चाळीमध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. तसेच आसपासचा परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. शनिवारपासून अशीच परिस्थिती असल्याने तसेच प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा निचरा व्हावा या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.