ETV Bharat / city

रेल्वेची रेकॉर्डब्रेक मालवाहतूक, एकाच दिवसात 1,145.68 दशलक्ष टनाची वाहतूक

गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेने 11 मार्चला कोरोनाचे आव्हान असून देखील, रेकॉर्डब्रेक मालवाहतूक केली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे सावट नसताना रेल्वेने 11 मार्चला 1 हजार 145.61 दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. मात्र यंदा अनेक निर्बंध असताना सुद्धा रेल्वेने तब्बल 1 हजार 145.68 दशलक्ष टन मालवाहतूक केल्याची माहिती जाहिर करण्यात आली आहे.

रेल्वेची रेकॉर्डब्रेक मालवाहतूक
रेल्वेची रेकॉर्डब्रेक मालवाहतूक
author img

By

Published : Mar 14, 2021, 4:16 PM IST

मुंबई- गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेने 11 मार्चला कोरोनाचे आव्हान असून देखील, रेकॉर्डब्रेक मालवाहतूक केली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे सावट नसताना रेल्वेने 11 मार्चला 1 हजार 145.61 दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. मात्र यंदा अनेक निर्बंध असताना सुद्धा रेल्वेने तब्बल 1 हजार 145.68 दशलक्ष टन मालवाहतूक केल्याची माहिती जाहिर करण्यात आली आहे.

मालवाहतुकीच्या प्रमाणात 10 टक्क्यांनी वाढ

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशभरातील वाहतूक सेवा ठप्प होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याचे काम रेल्वेने केले. यात 11 मार्च 2021 रोजी रेल्वेने मागील वर्षीच्या एकूण मालवाहतुकीच्या लोडिंगला मागे टाकले आहे. 11 मार्च 2021 रोजी रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीचे प्रमाण 1 हजार 145.68 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे. तर, मागील वर्षी याच दिवशी 1 हजार 145.61 दशलक्ष टन मालवाहतुकीचे प्रमाण होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मालवाहतुकीच्या प्रमाणात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रेल्वेकडून वाहतूक खर्चात सूट

कोरोनाचे आव्हान असूनही भारतीय रेल्वेने गत वर्षाच्या एकूण मालवाहतुकीचा आकडा यावर्षी पार केलेला आहे. मालवाहतूकदारांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेने वाहतूक खर्चात सूट व सवलतीची घोषणा केली आहे. रेल्वेच्या विविध परिमंडल आणि विभागांतील व्यवसाय विकास प्रशासनांना याबाबत सूचनाही दिल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून उद्योग क्षेत्रातील व्यक्तीशी नियमित संवाद साधला जात आहे. तसेच मालवाहतूकदारांना मिळणाऱ्या जलद वाहतूक सेवेमुळे रेल्वेच्या मालवाहतूक व्यवसायात वाढ होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.