मुंबई - भारतासह संपूर्ण आशिया खंडात 1853 साली आजच्याच दिवशी 3 वाजून 35 मिनीटांच्या मुहूर्तावर पहिली रेल्वे गाडी बोरीबंदर ते ठाणे स्थानकांदरम्यान धावली होती. आज या घटनेला तब्बल 168 वर्ष पूर्ण झाले असून त्या गाडीची वेळ रेल्वेकडून आजही सीएसएमटी ते ठाणे याच स्थानकांसाठी राखून ठेवण्यात आलेली आहे. हीच इतिहासिक वेळ आणि त्या ऐतिहासिक क्षणाला पुन्हा उजाळा देण्याचा हा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.
168 वर्षापासून रेल्वे जोपासते इतिहास, "त्याच" वेळी सुटते आशियातील पहिली गाडी जगन्नाथ शंकरशेठ यांचा पुढाकार-
1844 साली मुंबईचे आद्यशिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांनी देशात आगगाडी सुरु करावी, असा प्रस्ताव ब्रिटिशांकडे मांडला. त्यांच्या याच प्रस्तावाला मान्यता देऊन 31 ऑक्टोबर 1850 रोजी ब्रिटिश सरकारने 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जी.आय.पी) या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने 56 किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट दिले होते. 16 एप्रिल 1853 चा दिवस उजाडला आणि भारतील पहिली रेल्वे मुंबईत धावली.
168 वर्षापासून रेल्वे जोपासते इतिहास, "त्याच" वेळी सुटते आशियातील पहिली गाडी तीन महाकाय राक्षसी इंजिन- 16 एप्रिल 1853 हा दिवस म्हणजे त्यावेळच्या समस्त भारतीयांसाठी एक चमत्कारच होता. आपणही त्या काळी असतो तर रेल्वे नावाची अजब गजब जादू बघून आपणही गोंधळलो नसतो तर नवलच, तर असा हा दिवस. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा त्याकाळी नागरिकांसाठी चमत्काराच होता. दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी एका ऐतिहासिक घटनेला प्रारंभ झाला. एक इतिहास घडला. भारतातील पहिला रेल्वेप्रवास सुरु होण्याआधी 21 तोफांची सलामी देण्यात आली होती. ही गाडी 14 डब्यांची होती. या 14 डब्यांचा गाडीला खेचण्यासाठी सिंधू, सुलतान आणि साहिब हे तीन महाकाय राक्षसी इंजिनांनी जोडण्यात आली होते.168 वर्षापासून रेल्वे जोपासते इतिहास, "त्याच" वेळी सुटते आशियातील पहिली गाडी 57 मिनिट प्रवास- पहिल्या गाडीच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी 400 नागरिकांना निमंत्रण दिले होते. या पहिल्या रेल्वे प्रवाशांमध्ये नामदार यार्डली, जज्ज चार्लस् जॅकसन् तसेच जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ ही यांचा समावेश होता. मुंबईत दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या मुहूर्तावर पहिली गाडी सोडण्यात आली होती. मुंबई ते ठाणे अंतर कापण्यासाठी तब्बल 57 मिनिट लागले होते. ही त्यावेळच्या तमाम भारतीयांसाठी एक जादूच होती. कारण पहिल्यांदाच घोडे बैलांशिवाय गाडी धावत होती. अनेकांनी तर या गाडीला बघून नारळ फोडले तर काहींनी लोटांगण घालून नमस्कार केला आणि काही नागरिकांनी या घटनेमुळे महामारी येईल, अशी अफवा सुद्धा पसरविली होती, अशी इतिहासत नोंद आहेत.168 वर्षापासून रेल्वे जोपासते इतिहास, "त्याच" वेळी सुटते आशियातील पहिली गाडी त्याच" वेळी सुटते आशियातील पहिली गाडी - आज या घटनेला तब्बल 168 वर्ष पूर्ण झाले असून त्या गाडीची वेळ रेल्वेकडून आजही सीएसएमटी ते ठाणे याच स्थानकांसाठी राखून ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्याची दक्षता रेल्वेकडून घेतली जात आहेत. 1853 साली मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली तेव्हापासून रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वे गाड्यांचे डबे, इंजिन यात बदल होत गेले. 1925 मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. ही सगळी ऐतिहासिक क्षणाचे चित्रे रेल्वेने आपल्या हेरिटेज म्युझियममध्ये जतन करून ठेवले आहेत.168 वर्षापासून रेल्वे जोपासते इतिहास, "त्याच" वेळी सुटते आशियातील पहिली गाडी हेही वाचा- खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार