मुंबई - कोरोनाचा धोका पाहता रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ केली आहे. 10 रुपयाच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता नागरिकांना 50 रुपये मोजावे लागणार आहे.
येत्या 30 दिवसांपर्यंत ही प्लॅटफॉर्म भाडेवाढ राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने सर्व विभागात तर मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागात फ्लॅटफॉर्म तिकीट भाडेवाढ केली आहे.