ETV Bharat / city

रेल्वेमंत्र्यांनी हिरावले मुंबईकरांचे पाच रुपयांचे लिंबू पाणी; ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल

25 मार्च 2019 रोजी मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात ते आठवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने सरबत बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता.  स्थानकावरील सर्व प्रकार एका सजग प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात टिपले होते. त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आलेला होता. व्हिडिओ व्हायरल होतास सर्वस्तरातून रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.

लिंबू शरबत
लिंबू शरबत
author img

By

Published : Apr 7, 2022, 9:43 PM IST

Updated : Apr 7, 2022, 10:04 PM IST

मुंबई- सध्या मुंबईसह उपनगरात उन्हाळ्याचा कडाक्याने अंगाची लाही होत असल्याने मुंबईकर रेल्वे स्थानकातील लिंबू सरबताचा आधार घेतात. मात्र, तीन वर्षांपासून मध्य रेल्वेने लिंबू सरबतवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे भर उन्हाळात नागरिकांना लिंबू सरबत पिण्यासाठी स्थानकाबाहेर वणवण फिरावे लागत आहे. लिंबू सरबत पुन्हा सुरू करा, यामागणीसाठी रेल्वे मंत्रालयपर्यंत प्रवासी संघटनेने निवेदन दिलेले आहे. रेल्वे मंत्र्यांनी यावर दुर्लक्ष केले आहे. याबाबतचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट आहे.

लिंबू सरबतवर का घातली बंदी - 25 मार्च 2019 रोजी मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात ते आठवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने सरबत बनवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता. कुर्ला स्थानकावरील ( Kurla railway station sarbat ) सर्व प्रकार एका सजग प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात टिपले होते. त्यानंतर हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आलेला होता. व्हिडिओ व्हायरल होतास सर्वस्तरातून रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून रेल्वेने तात्काळ त्या स्टॉलधारकावर कारवाई केली. मध्य रेल्वेवरील सर्व लिंबू पाणी आणि कालाखट्टा बंदी घातली आहे. आज जवळ जवळ या घटनेला तीन वर्ष झाली. मात्र, मध्य रेल्वेमार्गावरील लिंबू सरबत बंदी कायम आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेकदा मध्य रेल्वे मार्गावरील लिंबू सरबतवरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे. मात्र, या मागणीकडे सर्रासपणे रेल्वेकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी गोरगरीब प्रवाशांना बाटलीबंद महागड्या कंपनीचे लिंबू पाणी प्यावे लागत आहे.

रेल्वेमंत्र्यांनी हिरावले मुंबईकरांचे पाच रुपयांचे लिंबू पाणी

प्रवाशांचे आरोग्य धोक्यात- उपनगरी प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, एका घटनेवरून गेल्या तीन वर्षांपासून मध्य रेल्वेने लिंबू सरबत कायमस्वरूपी बंदी घातली आहे. पूर्वी रेल्वे उपाहारगृहात प्रवाशांना फक्त तीन रुपयात चांगल्या पद्धतीचे लिंबूसरबत मिळत होते. सध्या उन्हाळा सुरू असतानाएक वेळचा अल्पपोहार मिळाला नाही तरी चालेल. मात्र पाणी आणि लिंबू सरबत मिळणे आवश्यक आहे. मात्र, लिंबू सरबत मिळत नसल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना स्थानकाबाहेर अनधिकृतपणे टोलवर लिंबू सरबर प्रवाशांना प्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज पश्चिम रेल्वे मार्गावर लिबू सरबत मिळत आहे. मात्र, मध्य रेल्वे लिबू सरबत मिळत नाही. त्यामुळे रेल्वे तात्काळ रेल्वे स्टॉलवर लिबू सरबत सुरू करण्यात यावेत, अशी मागणीसुद्धा नंदकुमार देखमुख यांनी केली आहे.

लिबू सरबतसाठी आंदोलन- मध्य रेल्वे एखादी रेल्वे अपघात झाला तर रेल्वे कायमस्वरूपी रेल्वे बंद करत नाही. मग लिबू सरबत का कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. रेल्वेला काहीतरी निमित्त पाहिजे होते. त्यामुळे लिंबू सरबत बंद करण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून उपनगरीय प्रवासी महासंघाकडून स्थानकावरील लिंबूसरबत पुन्हा सुरू करण्यात यावा याकरिता प्रयत्न करत आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांपासून तर महाव्यवस्थापकापर्यत अनेक निवेदन दिले आहे. इतकेच नव्हेतर रेल्वेमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहून लिंबू सरबत सुरू करण्याची मागणीही आम्ही केली आहे. मात्र रेल्वेमंत्री आमचा मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. येत्या आठ दिवसात लिंबू सरबर सुरू केले नाही. तर आम्ही रेल्वे विरोधात आंदोलन करू अशी प्रतिक्रिया
उपनगरी प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे.

मध्य रेल्वे काय म्हणते- कुर्ला रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ स्टॉलवर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवल्या जात असल्याचा व्हिडिओ 2019 मध्ये व्हायरल झालेला होता. त्यानंतर मध्य रेल्वेकडून त्या स्टॉलधारकावर कारवाई केली होती. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत मध्य रेल्वेने लिंबू सरबतवर बंदी घातली होती. तेव्हापासून ही बंदी तशीच कायम आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के. सिंग यांनी ईटीव्ही भारताला दिली.

हेही वाचा-Star Campaign In Schools : यंदा पाहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग राबविणार 'स्टार' उपक्रम

हेही वाचा-राज ठाकरे यांच्या सभेला रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे विरोध - विजय घाटे

हेही वाचा- MNS Vasant More : 'कोणत्याही पक्षात जाणार नाही', शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

etv play button

Last Updated : Apr 7, 2022, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.