ETV Bharat / city

भाजपचे रेलभरो आंदोलन; रेल्वेचा 'विरोधी पक्षनेत्या'ला झटका, वसूल केला २६० रुपयांचा दंड - भाजपचे रेलभरो आंदोलनात प्रविण दरेकरांना दंड

भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती, यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चर्चगेट स्थानकात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चर्चगेट ते चर्नी रोड विनातिकीट लोकलने प्रवास केला आहे. यादरम्यान चर्नी रोड स्थानकात दरेकर यांना रेल्वे टीसीने अडवले आणि विनातिकीट प्रवास केल्याबद्दल त्यांच्याकडून 260 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Opposition Leader
प्रविण दरेकरांकडून दंड वसूल करताना टीसी
author img

By

Published : Aug 6, 2021, 4:05 PM IST

Updated : Aug 6, 2021, 4:56 PM IST

मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपने आज मुंबईत आंदोलन केले. भाजपने राज्य सरकार विरोधात केलेल्या या रेलभरो आंदोलनात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चर्चगेट ते चर्नी रोड विनातिकीट लोकलने प्रवास केला. त्यामुळे रेल्वेने त्यांच्याकडून २६० रुपयांचा दंड आकाराला आहे. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

भाजपचे रेलभरो आंदोलन; रेल्वेचा 'विरोधी पक्षनेत्या'ला झटका, वसूल केला २६० रुपयांचा दंड

आंदोलक भाजप कार्यकर्त्यांची धरपकड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेली लोकल रुळावर धावू लागल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. सर्व सामान्य मुंबईकरांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा सुरू करावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चर्चगेट स्थानकाबाहेर आज रेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. मात्र, स्थानकांवर जात असताना पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यांची धरपकड करत पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

प्रविण दरेकर यांच्याकडून वसूल केला 260 रुपयाचा दंड

आंदोलनादरम्यान जेव्हा भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती, यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चर्चगेट स्थानकात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चर्चगेट ते चर्नी रोड विनातिकीट लोकलने प्रवास केला आहे. यादरम्यान चर्नी रोड स्थानकात दरेकर यांना रेल्वे टीसीने अडवले आणि विनातिकीट प्रवास केल्याबद्दल त्यांच्यावर 260 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरेकर यांनीही रेल्वेचा दंड भरला. यावेळी त्यांनी सांगितले, की आम्ही कायदेभंग केला. विनातिकीट प्रवास केला. त्यामुळे २६० रुपयांचा दंड भरला आहे. पोलीस, रेल्वे प्रशासन त्यांचे काम करत आहेत. त्याला आमचा विरोध नाही. पण सरकारच्या धोरणावर आमचा आक्षेप आहे. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येत आहे. मग लोकल ट्रेनमधून प्रवास का करू दिला जात नाही ? सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की

लोकल सुरू करण्याचा मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेत्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर रेल भरो आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी स्टेशनबाहेर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चर्नी रोड स्टेशनमध्ये आंदोलनादरम्यान वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी सुद्धा स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केला. चर्चगेट स्थानकातून प्रवास करायला लोकलमध्ये बसलो, असता रेल्वेने ती लोकल कारशेडमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही एक प्रकारची दडपशाही आहे. ही दडपशीही तात्काळ थांबवावी असेही दरेकर यावेळी म्हणाले.

विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलन

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेर सरकारविरोधात आंदोलन केले. याशिवाय आज बोरिवली, सायन स्थानकात सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.

Last Updated : Aug 6, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.