मुंबई - जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना
गृह मंत्रालयाने उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर दूरवर परीक्षा केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांसमोर प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. अखेर हा प्रश्न सुटला असून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावरून या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी प्रवास करता येणार आहे.
जेईई आणि एनईईटीत प्रवेश घेणार्या उमेदवारांचे ओळख पत्रासोबत परीक्षेच्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांना उपनगरीय स्थानकांमध्ये प्रवेश दिला जाईल.
स्टेशन आणि सुरक्षा अधिकारी यांना परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी. यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.