नई दिल्ली - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज लखीमपुर खीरी येथे जाण्याची शक्यता आहे. रविवार येथे शेतकरी आंदोलनात भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाचे वातवरण आहे. दरम्यान, यातील मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज राहुल गांधी लखीमपुरला जातील अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, लखीमपुला येण्यासाठी गांधी यांना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने बंदी घातली आहे. खीरी येथील घटनेनंतर येथे आता जमाव बंदीचे (144)कलम लागू करण्यात आले आहेत.
सरकारकडे परवानगी मागितली होती
राहुल गांधी यांच्यासह 5 लोकांचे एक शिष्टमंडळ सोबत असणार आहे. त्याबाबत योगी सरकारकडे काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी परवानगी मागितली होती. मात्र, योगी सरकारने परवानगी नाकारली आहे. परंतु, सांगितले जात आहे, की राहुल यांच्या नेतृत्वात पाच लोकांचे एक शिष्टमंडळ बुधवारी (दि. 6 ऑक्टोंबर)रोजी लखीमपुर खीरी येथे जातील. राहुल हे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची सांतवनपर भेट घेऊ इच्छीतात. दरम्यान, त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करू आपल्या सहवेदना ते व्यक्त करणार आहेत.
काँग्रेस नेत्यांना परवानगी नाकारली आहे
अअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटनेचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी योगी आदित्यनाथ यांना एक पत्र पाठवले आहे, ज्यात असे म्हटले आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पाच सदस्यीय शिष्टमंडळ 6 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीला भेट देईल. उत्तर प्रदेश राज्य सरकारने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी दिली आहे, परंतु काँग्रेस नेत्यांना परवानगी नाकारली आहे. हे बरोबर नाही, असही वेणुगोपाल म्हणाले आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही भेट देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
हेही वाचा - हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? आजच्या सामना आग्रलेखात केंद्र सरकारवर घणाघात