मुंबई - वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करून वायूप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी जारी करणाऱ्या केंद्रांना चाचणीसाठी आकारण्यात येणारा शुल्कात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्यास परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधीच इंधन दरवाढीने होरळपलेल्या वाहन चालकांना आता पीयूसी दरवाढीचे चटके बसणार आहे.
असे आहे नवीन दर - परिवहन विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार, दुचाकी वाहनांना आता पीयूसीसाठी पस्तीस रुपये ऐवजी पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत. याउलट पेट्रोलवर धावणाऱ्या तीन चाकी वाहनांना 70 रुपयांऐवजी शंभर रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर धावणाऱ्या चारचाकी वाहनांना 90 रुपयांऐवजी 125 रुपये डिझेलवर जाणाऱ्या वाहनांना 110 रुपयांऐवजी 150 रुपये आकारले जातील. सुधारित दरवाढ 25 एप्रिलपासून लागू करताना पीयूसी केंद्रांकडून या निर्णयाची अंमलबजावणी होतेय की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
राज्यात 13 हजार पीयूसी सेंटर - राज्यात जवळ जवळ 13 हजार पीयूसी सेंटर आहे. सर्व सेंटर आरटीओच्या अंतर्गत कार्यरत असतात त्यांना ठराविक कालावधीत पीयूसी मशीनची देखभाल दुरुस्ती आणि अपग्रेडेशन करावे लागते. आरटीओ कार्यलयाकडून या सेंटरची तपासणी देखील केली जाते.
राज्यातील वाहन चालकांना पीयूसी दरवाढीचा झटका; परिवहन विभागाकडून मंजुरी! - महाराष्ट्र परिवहन विभाग बातमी
परिवहन विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार, दुचाकी वाहनांना आता पीयूसीसाठी पस्तीस रुपये ऐवजी पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत. याउलट पेट्रोलवर धावणाऱ्या तीन चाकी वाहनांना 70 रुपयांऐवजी शंभर रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर धावणाऱ्या चारचाकी वाहनांना 90 रुपयांऐवजी 125 रुपये डिझेलवर जाणाऱ्या वाहनांना 110 रुपयांऐवजी 150 रुपये आकारले जातील.