ETV Bharat / city

Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाकडून अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने - Maratha kranti morcha agitation mumbai

मराठा क्रांती मोर्चाने अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी केलेल्या निदर्शनानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आबहे. मात्र शासनाकडून मराठा आरक्षण आणि मागण्यांबाबत योग्य दखल लवकरात लवकर घेतली गेली नाही तर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चा कडून यावेळी देण्यात आला आहे.

अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

author img

By

Published : Jan 19, 2022, 1:13 PM IST

मुंबई - मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्याबाहेर मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयकांनी निदर्शने केली आहेत. पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

मराठा समाजातील मुलांना वसतिगृह देऊ, अशी घोषणा राज्य सरकार कडून केली होती. परंतु अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. मराठा आरक्षणाचा विषयही मार्गी लागलेला नाही. कोपर्डी बलात्कार घटने प्रकरणात राज्य सरकारकडून उदासीनता दिसत आहे. सारथी संस्थेचा विस्तार राज्य सरकारकडून केला जाईल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र अद्यापही सारथी संस्थेच्या विस्ताराबाबत राज्य सरकारकडून कोणती महत्त्वाची पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे सारथी संस्थेचा विस्तार का अडकला? अशा मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांकडून अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.