ETV Bharat / city

प्रताप सरनाईक व त्यांच्या दोन्ही मुलांना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण - Saranaik & high court

सरनाईक आणि त्यांच्या दोन्ही मुलांना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याचबरोबर हे संरक्षण प्रताप सरनाईक यांचे जवळचे मानले जाणारे योगेश चंडेला यांनादेखील देण्यात आला आहे.

Pratap Saranaik
Pratap Saranaik
author img

By

Published : Jul 6, 2021, 7:09 PM IST

Updated : Sep 11, 2021, 4:44 PM IST

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. या प्रकरणात त्यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. याचप्रकरणी प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सरनाईक आणि त्यांच्या दोन्ही मुलांना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याचबरोबर हे संरक्षण प्रताप सरनाईक यांचे जवळचे मानले जाणारे योगेश चंडेला यांनादेखील देण्यात आला आहे.

गैरव्यवहाराचा आरोप

टिटवाळा येथे एका जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर आहे. तसंच नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड मध्येदेखील गैरव्यवहार केल्याचा आरोप सरनाईक यांच्यावर आहे. सरनाईक यांचे दोन्ही मुले विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक त्याचबरोबर सरनाईक यांचे जवळचे मानले जाणारे योगेश चंडेला यांच्यावरदेखील याच प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप आहेत. याचप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने या चौघांना समन्स बजावले होते.

आणखी एक प्रकरण प्रलंबित

सक्तवसुली संचालनालयाच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी या चौघांनीही हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. यासंदर्भातील आणखी एक प्रकरण प्रलंबित असल्याने ईडीने अटकेची कारवाई करू नये, अशी मागणी सरनाईक यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे आज त्यावर सुनावणी झाली. आधीच्या एका प्रकरणात सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.

कोण आहेत प्रताप सरनाईक?

प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. बालपणीच वर्धा जिल्ह्यातून ते मुंबईला स्थायिक झाले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबिवलीच्या एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ रिक्षा चालवली. १९९७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणात उडी मारली. १९९७मध्ये ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००८मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. २००९मध्ये ते आमदार झाले. ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते तीनदा आमदारपदी निवडून आले आहेत. २०१९च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात त्यांनी १२५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता दाखवली होती.

Last Updated : Sep 11, 2021, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.