पुणे - पुण्यामधील कोरेगाव पार्क येथे येथील सोसायटी घरफोडी करणाऱ्या पोलिसांनी एकास अटक केली आहे. कोरेगाव पार्क येथील लिबर्टी सोसायटी बंगला नंबर 7 फेझ 1नॉर्थ रोड येथे त्याच्या खिडकीमधून जाऊन आय फोनचा लॅपटॉप मोबाईल आणि इतर काही सामान असे दहा लाखाचा चोरी झाली होती.
कंपनीच्या ऑफिसमध्ये चोरी - 18 तारखेला अज्ञात चोरट्याने दोन पावर स्पीकर दोन सराऊंड स्पीकर एक ऍम्प्लिफायर एक बोंब बॉक्स तसेच त्याचबरोबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिसमध्ये एक 65 इंची एलईडी टीव्ही अशी घोरपडी करून चोर गेले होते. त्या प्रकरणी करीम एहसान धनानी याने फिर्याद दिली होती.
मुंडवा पोलिसांकडून त्याला अटक - दाखल गुन्ह्यामध्ये कुठलेही सीसीटीव्ही फुटेज साक्षीदार उपलब्ध नव्हती, त्यामुळे चोराला पकडणे पोलीस अधिकाऱ्यांसमोर एक आव्हान होते. परंतु, चोराने पोलिसांनी गणेश तीमंना साखरे वय वर्ष 21 राहणार रेणुका नगर वस्ती नाथ रोड कोरेगाव पार्क पुणे यानेही चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंडवा पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आयफोन कंपनीचे मोबाईल एप्पल वॉच डेल कंपनीचा लॅपटॉप साउंड बॉक्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असे अंदाजे दहा लाख किमतीचा मतेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोप करून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'त्या' १२ खासदारांना अपात्र ठरवा.. संजय राऊतांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी