मुंबई दहीहंडीसाठी यंदा सुट्टी जाहीर केल्याने, गोविंदांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. तसेच गोविंदाना यंदा १० लाखाचे विमा कवच दिल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण असून, गोविंदाचा समावेश धाडसी क्रीडा प्रकारात करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जर हे शक्य झाले तर पुढच्या वर्षांपासून from next year प्रो गोविंदा दहीहंडी Pro Govinda Dahi handi सुरू करणार असल्याचे, आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांनी सांगितले आहे. विधान भवनात बोलतांना त्यांनी याबाबत माहिती दिली.
यंदा दहीहंडीला लवकर सुट्टी जाहीर आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, २०१२ साली आमच्याच गोविंदा आयोजनामध्ये जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने विश्व विक्रम केला होता. हा एक धाडसी क्रिडा प्रकार असून यामध्ये गोविंदाना खेळाडूंचा दर्जा भेटायला हवा. त्यासाठी आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा केला. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. वास्तविक दर वर्षी दहीहंडीच्या दोन ते तीन दिवस अगोदर सुट्टी जाहीर केली जाते. पण यंदा आम्ही ही सुट्टी दोन ते तीन आठवडे अगोदर जाहीर करावी, जेणेकरून गोविंदाना सरावासाठी अवधी मिळेल. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आहे.
१० लाखाच्या विम्यामुळे गोविंदा पथकामध्ये उत्साह गोविंदांसाठी १० लाखाचे विमा कवच सरकारने यंदा जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व गोविंदा पथकामध्ये उत्साह असल्याचे सरनाईक म्हणाले. त्याच बरोबर याचा समावेश धाडसी क्रीडा प्रकारात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. म्हणून पुढच्या वर्षांपासून प्रो गोविंदा सुरू होणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा National Anthem In Nagpur तृतीयपंथींनी एकत्र येऊन केले राष्ट्रगीत गायन