ETV Bharat / city

म्यूकरमायकोसिस उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित; अधिसूचना जारी - hospital rates of mucomycosis

राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) मंजूरी दिली. दर निश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Jun 4, 2021, 4:39 PM IST

मुंबई - महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र खासगी रुग्णालयात म्यूकरमायकोसिस आजारावरील उपचाराबाबत राज्य सरकारकडून दर निश्चित करण्यात आले आहेत.

राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) मंजूरी दिली. दर निश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

आजपासून अधिसूचना लागू -

खासगी रुग्णालयात म्यूकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील. संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

असे असतील म्यूकरमायकोसिसवरील उपचाराचे दर

  • वॉर्डमधील अलगीकरण अ वर्ग शहरांसाठी ४ हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३ हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २ हजार ४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.
  • व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण
    अ वर्ग शहरांसाठी ७ हजार ५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५ हजार ५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४ हजार ५०० रुपये
  • व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण
    अ वर्ग शहरांसाठी ९ हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६ हजार ७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५ हजार ४०० रुपये

शहरांचे वर्गीकरण -

  • अ वर्ग शहरे - मुंबई तसेच महानगर क्षेत्र (मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, डिगदोह, वाडी) यांचा समावेश आहे.
  • ब वर्ग शहरे - नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.
  • क वर्ग गटातील शहरे - अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे म्यूकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला आहे. अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 10 हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७ हाजर ५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.