मुंबई मुंबईतील लालबाग, परळ, भायखळा, डीलाईल रोड, चिंचपोकळी नायगाव या गिरण गावात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मुंबईतील चाकरमानी मध्यमवर्गीय गणेशोत्सवासाठी Ganeshotsav 2022 अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. गणेशोत्सवात सगळेच अत्यंत भक्तिमय आणि तल्लीन होऊन जातात. प्रत्येक घरात गणेशाची मूर्ती स्थापन केली जाते. त्यासाठी या भागातील मूर्तिकारांना प्रचंड मागणी आहे. मात्र, यंदा गणेशमूर्तीच्या दरात Ganesha Idols Price Increased ३० ते ५० टक्क्यांची 30 to 50 percent increase this year वाढ झाल्याचे मुर्तीकार सांगतात.
कोणत्या मूर्तींना असते मागणी गणपतीसाठी बाल गणेश मूर्ती, पेशवाई गणेश मूर्ती, टिटवाळा गणेश मूर्ती, लालबागचा राजा गणेश मूर्ती, फेटा गणेश मूर्ती आणि फॅन्सी गणेश मूर्ती अशा गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते असे विक्रेते सांगतात.
विविध रूपातील गणेश मूर्ती साधारण भाविकांकडून एक ते दीड फुटाच्या गणेश मूर्ती आणि चार फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींची मागणी असते. विठ्ठल मूर्तीच्या रूपातील गणेश मूर्ती, श्रीकृष्ण रूपातील गणेश मूर्ती, बाल श्रीकृष्णाची मोहक गणेश मूर्ती तसेच विविध रूपातील गणेश मूर्तींना भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. असे गणेश मूर्ती विक्रेते किरण अडसूळ यांनी सांगितले.
शाडूच्या गणेश मूर्ती तुलनेने महाग दरवर्षी भाविकांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची मागणी केली जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुबक गणेश मूर्ती आम्ही भाविकांसाठी उपलब्ध करून देतो. मात्र पर्यावरण पूरक आणि भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान असलेल्या शाडूच्या गणेश मूर्तीनांही मोठी मागणी असते. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर सुरुवातीला बंदी होती. मात्र नंतर त्याला परवानगी देण्यात आली. त्यामुळे आयत्या वेळेस मूर्ती करायची खूपच धांदल उडाली. तसेच शाडूच्या गणेश मूर्तीही आम्ही भाविकांसाठी तयार केल्या आहेत. मात्र यंदा दोन्ही प्रकारच्या गणेश मूर्तींच्या किमतीत 30 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब किंवा मध्यमवर्गीय ग्राहकांना या किमती कशा परवडणार असा प्रश्न आम्हा विक्रेत्यांनाही पडला आहे. तरीही भावीक काहीही करून मूर्ती घेऊन जातात, असे मूर्ती विक्रेते मनीष नाईकडे यांनी सांगितले.