मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट ( Sachin Tendulkar Meet Ramnath Kovind ) घेतली आहे. त्यांची ही भेट मुंबईमधील राजभवनात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर ( President Ramnath Kovind Maharashtra Tour ) आहेत. आज राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण झाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद गुरुवारी मुंबईला पोहोचले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagtisngh Koshyari ) आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते आज शुक्रवारी ११ फेब्रुवारीला राजभवनात बांधण्यात आलेल्या नवीन दरबार हॉलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी सचिन तेंडूलकर याची भेट घेतली. याबाबतचे फोटो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले आहे.
-
Legendary cricketer and Bharat Ratna Shri Sachin Tendulkar called on President Ram Nath Kovind at Raj Bhavan, Mumbai. pic.twitter.com/CreSGku2H7
— President of India (@rashtrapatibhvn) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Legendary cricketer and Bharat Ratna Shri Sachin Tendulkar called on President Ram Nath Kovind at Raj Bhavan, Mumbai. pic.twitter.com/CreSGku2H7
— President of India (@rashtrapatibhvn) February 11, 2022Legendary cricketer and Bharat Ratna Shri Sachin Tendulkar called on President Ram Nath Kovind at Raj Bhavan, Mumbai. pic.twitter.com/CreSGku2H7
— President of India (@rashtrapatibhvn) February 11, 2022
आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र
राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण केल्यावर बोलताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात 12 वेळा मी महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध राहिला आहे. महाराष्ट्राचा अर्थ सांगायचा झाला तर भाषा विज्ञानाकडे जायची गरज नाही. तुमचे हृदयच महाराष्ट्राचा अर्थ सांगेल. आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. अर्थातत भारताचं महान राज्य आणि क्षेत्र अशा शब्दांत कोविंद यांनी महाराष्ट्राचा गौरव केला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
हेही वाचा - Hijab Ban Case : दिलीप वळसे पाटील यांचे हिजाब मुद्यावर शांती राखण्याचे आवाहन