मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधात बसायची तयारी ठेवावी, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी झालेल्या बैठकीत आपल्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी देखील कठोर भूमिका घ्यायला हवी, अशी भूमिका शरद पवार यांनी या बैठकीत मांडली आहे.
हेही वाचा - Rebel MLA Eknath Shinde : गेली अडीच वर्ष बंगल्याची दारे अमच्यासाठी बंदच; एकनाथ शिंदे यांचा लेटर बाँम्ब
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडखोरीच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल आहे. या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा पुन्हा एकदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीचे सत्र सुरू केले आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधल्यानंतर शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास दिला.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा - शिवसेनेत उठलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारला फटका बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे उभा असून, मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : 'त्या' आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, संजय राऊत यांचा इशारा