ETV Bharat / city

गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला नसल्याचे मुंबई पालिकेचे स्पष्टीकरण - Pregnant woman died

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने योग्य वेळेत तीला उपचार मिळाले नाहीत. दरम्यान, त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या महिलेचा मृत्यू डॉक्टर उपलब्ध न झाल्याने झाला नसून प्रकृती खराब असल्याने झाला असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला नसल्याचे मुंबई पालिकेचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Sep 29, 2021, 6:55 AM IST

मुंबई - एका गर्भवती महिलेला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यावेळी तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने योग्य वेळेत तीला उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेचा मृत्यू डॉक्टर उपलब्ध न झाल्याने झाला नसून प्रकृती खराब असल्याने झाला असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

महिलेला दोन दिवसांपासून ताप

मुलुंड परिसरातील रहिवासी असलेली व ७ महिन्यांची गर्भवती २६ वर्षीय महिला (२६ सप्टेंबर २०२१)रोजी मुंबई महानगरपालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. सदर महिलेला त्या आधी दोन दिवसांपासून ताप होता. आवश्यक ती तपासणी केल्यानंतर सदर महिलेला रक्त तपासणी करण्याचा आणि लक्षणे आधारित उपचार करण्याचा डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, मुलुंड येथील महापालिकेच्या प्रसूतिगृहात (२७ सप्टेंबर)रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर महिलेचे रक्तनमुने वैद्यकीय चाचण्यांसाठी पाठवण्यात आले होते.

प्रकृती झाली होती स्थिर

प्रसुतीगृहात दाखल झाल्यानंतर सदर महिलेचा ताप कमी झाला होता. तिची प्रकृतीही स्थिर होती. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी सदर महिलेस जुलाबाचा त्रास झाला. यानंतर उपचार दिल्यावर महिलेची प्रकृती स्थिर झाली होती. मात्र, रात्री बारा वाजता च्या सुमारास सदर महिलेस पुन्हा एकदा जुलाबाचा त्रास सुरू झाला. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी तीला येथील स्वातंत्र्यवीर सावरकर रूग्णालयात हलवले.

नातेवाईकांशी संपर्क नाही -

रुग्ण महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ न शकल्याने याबाबत स्थानिक पोलिसांना नातेवाईक उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर सदर महिला रुग्णास स्वातंत्र्यवीर सावरकर रूग्णालयात हलवण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर महिलेची परिस्थिती बघून तिला नायर रुग्णालयात हलवले. मात्र, यावेळी देखील नातेवाईक उपस्थित नव्हते. नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित नातेवाईक येण्यापर्यंत महिलेची तब्येत जास्तच खालावली.

तब्येतीत सुधारणा न झाल्याने मृत्यू -

महिला रुग्णावर कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू केले. मात्र, रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर मध्यरात्री ३:२२ वाजता महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.