ETV Bharat / city

केईएम रुग्णालयात ऑक्सिजन मशीनचा तुटवडा; प्रविण दरेकर म्हणाले... - अपडेट न्यूज इन मुंबई

केईएम रुग्णालयात ऑक्सिजन मशीनचा तुटवडा आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केईएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करुन आढावा घेतला.

Mumbai
आढावा घेताना प्रविण दरेकर
author img

By

Published : May 30, 2020, 5:58 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रोज हजाराहून अधिक नवे रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. रुग्ण वाढत असताना मुंबई महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या केईएम रुग्णालयात ऑक्सिजन मशीनचा तुटवडा आहे. त्यासाठी हाय-फ्लो-नेझल कॅनूला या ऑक्सिजन मशीन आपल्या आमदार निधीतून देणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केईएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करुन आढावा घेतला. याबाबत बोलताना दरेकर यांनी सांगितले, की केईएम रुग्णालयालात आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे कार्यान्वित आहे, याची पाहणी करण्यात आली. कालच मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी आणि संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन मुंबई महापालिका कोविड संदर्भात कशाप्रकारे व्यवस्था करते, याची माहिती घेतली. कोविड रोखण्यासाठी व तेथील रुग्णांवर उपचाराबाबत केईएम रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे, याबाबत आज प्रत्यक्ष आढावा घेतला.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्याबरोबर त्यांना ज्या मशीन्सची गरज आहे, त्या देखील पुरवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका आणि राज्य शासनाचे पाठबळ आवश्यक आहे. हे पाठबळ देणे विरोधी पक्ष म्हणून आमचीही जबाबदारी असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. केईएम रुग्णालय हे सर्व सामान्यांचे रुग्णालय असून रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी सशक्त आणि परिपूर्ण आरोग्य व्यवस्थांची गरज आहे. तरी ज्या सूचना सरकारला करायच्या आहेत व सरकारकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्या सरकारला द्यायला भाग पाडू.

या संदर्भात पालिका आयुक्तांशी बोलणार असून येथील व्यवस्था रुग्णांच्या सेवेसाठी अधिक सुलभ होईल, यासाठी प्रयत्न व पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. केईएम रुग्णालयाच्या भेटीदरम्यान रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या निधनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देणे, तेथील आरोग्य यंत्रणा या सर्व विषयांवर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी तपशीलवार चर्चा झाल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.