ETV Bharat / city

Kirit Somaiya in Kolai : किरीट सोमैय्या यांच्या केसाला धक्का लागला तर... प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेला इशारा

author img

By

Published : Feb 18, 2022, 2:51 PM IST

Updated : Feb 18, 2022, 3:03 PM IST

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कोलई या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतमध्ये ( Rashmi Thackeray Bungalow in Kolai ) आहे. तशा पद्धतीचे पुरावे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दाखविले होते. तेथील वातावरण बघता किरीट सोमैय्या यांच्या केसालाही धक्का लागला, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर ( Praveen Darekar warning on Somaiyas security ) यांनी दिला आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैय्या रायगड, पेण येथील मुख्यमंत्र्यांचे तथाकथित 19 बंगले पाहण्यासाठी हे आज कोलई येथे ( Kirit Somaiya in Kolai ) पोहोचलेले आहेत. परंतु तेथे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाद होण्याची शक्‍यता आहे. जर किरीट सोमैय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी ते सहन केले जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar warning to Shivsena ) यांनी दिला आहे.

केसालाही धक्का लागता कामा नये!
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कोलई या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतमध्ये ( Rashmi Thackeray Bungalow in Kolai ) आहे. तशा पद्धतीचे पुरावे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दाखविले होते. परंतु काही दिवसांपूर्वी सेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना खासदार, नेते संजय राऊत यांनी या गोष्टीचे खंडन करत अशा प्रकारे कुठलाही बंगला तिथे अस्तित्वात नाही, असे सांगितले होते. त्या अनुषंगाने याची सविस्तर माहिती घेण्यासाठी व सत्य जाणून घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैय्या हे आज कोलई या गावांमध्ये पोहोचलेले आहेत. तिथे शिवसेनेकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेथील वातावरण बघता किरीट सोमैय्या यांच्या केसालाही धक्का लागला, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर ( Praveen Darekar warning on Somaiyas security ) यांनी दिला आहे.

प्रवीण दरेकर

हेही वाचा-LIVE UPDATE Kirit Somaiya : किरीट सोमैयांची कोर्लई ग्रामपंचायत कार्यालयाला भेट, रेवदंड्याकडे रवाना

काही दिवसांपूर्वी केले होते ट्विट
सोमैय्या यांनी ट्विट करत बंगल्यांसदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगल्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी गाव कोर्लई, (ता. अलिबाग) आणि रेवदंडा पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे कुटुंब आणि अन्वय नाईक यांनी 1 एप्रिल 2009 ते मार्च 2021 या कालावधीत 19 बंगल्यांवर मालमत्ता कर, वीज कर व आरोग्य कर भरले आहेत. शेवटचे देयक 12 नोव्हेंबर 2020 ला दिले आहे. काय झाले या बंगल्यांचे? चोरी झाले का ? असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला होता.

हेही वाचा-Sanjay Raut Allegation Kirit Somaiya : 'एक खुनी पुन्हा एकदा अलिबागच्या भूमीवर चाललाय,' राऊतांची सोमैयावर घणाघाती टीका

बंगले हरविले का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर कोलईती 19 बंगले असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला होता. हे बंगले मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्र लिहून नावावर करा, असे सांगितले होते, असा पुरावा ही किरीट सोमैय्या यांनी सादर केला आहे. परंतु सध्या त्या ठिकाणी कुठलाही बंगला अस्तित्वात नसल्याने याबाबत नेमके कोण खरे बोलत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

हेही वाचा-Kirit Somaiya-Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमैया कोर्लई गावाच्या दिशेने रवाना

Last Updated : Feb 18, 2022, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.