मुंबई - हैदराबाद मधील महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार हा निंदनीय असून पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
हैदराबाद पोलिसांचा एन्काऊंटर कायद्याला धरून नसल्याचे मत आंबेडकर यांनी मांडले. तसेच ही अराजकता माजवण्याची पद्धत असून या कृतीचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी न्यायालयाच्या भूमिकेत जाऊ नये, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.