ETV Bharat / city

'ही' तर सुरुवात, वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल - प्रकाश आंबेडकर - वंचित बहुजन आघाडी

शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही, म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला. त्यामुळे वांद्रे सारखे उठाव आता महाराष्ट्रभर होतील आणि असे उठाव झाले, तर देशभर उठाव व्हायला वेळ लागणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 15, 2020, 3:14 PM IST

मुंबई - लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढवल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल, असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही, म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला. शासनाने योग्य ते पाऊल उचलले नाही, तर त्याचा उद्रेक देशभर होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

'ही' तर सुरुवात, वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल - प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉक डाऊनला विरोध केला. लॉक डाऊन वाढवल्याने आपल्यावर उपासमारीची पाळी येईल, अशी भीती या कामगारांना वाटली. त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. या अगोदरही शासनाला आपण विनंती केली होती. शासनाकडे अन्नधान्याचा प्रचंड प्रमाणात साठा आहे. दोन महिन्याचे अन्नधान्य मोफत वाटले असते, तरी चालले असते. परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची सुरुवात वांद्रे येथे झाल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

शासनाने कृती करण्याऐवजी आम्ही 21 दिवसांमध्ये कोरोना कसा थांबवला त्याचे ते गुणगान करीत राहिले. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना काय सुविधा, मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच अपेक्षित उत्तर देण्यात आले नाही. तसा खुलासाही झाला नाही. त्यामुळे वांद्रे सारखे उठाव आता महाराष्ट्रभर होतील आणि असे उठाव झाले, तर देशभर उठाव व्हायला वेळ लागणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे जागे व्हा आणि कामाला लागा अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी केली.

गुजरात राज्यातील सूरत येथे अशाच कामगारांनी सरकार विरोधात आवाज उठवत रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनावरील नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरातमध्येही लॉक डाऊनला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. असे उठाव देशभर होणार असल्याचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिल्यानंतर काही तास उलटत नाही, तोच सूरतमध्ये आंदोलन झाल्याने आता हा इशारा प्रत्यक्षात रस्त्यावर दिसून आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.