ETV Bharat / city

मालेगाव स्फोट प्रकरण; प्रज्ञा सिंग ठाकूर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर

मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंग ठाकूर या अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर होत नव्हत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यांना बोलवण्यात आल्यानंतर आज त्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर झाल्या.

Pragya Singh Thakur appears in NIA special court
प्रज्ञा सिंग ठाकूर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर
author img

By

Published : Nov 24, 2021, 10:22 PM IST

Updated : Nov 24, 2021, 10:43 PM IST

मुंबई - मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंग ठाकूर या अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर होत नव्हत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यांना बोलवण्यात आल्यानंतर आज त्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयात तब्येत खराब असल्याचे कारण सांगत, मी न्यायालयात येऊ शकली नाही, मी आज मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल होणार आहे, मात्र न्यायालय मला जेव्हा हजर राहण्याचे सांगेल, त्यावेळी मी हजर राहणार, असे भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी न्यायालयाला सांगितले.

माहिती देताना भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर

हेही वाचा - VIDEO : पगारवाढ नको विलीनीकरण करा; आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका

प्रज्ञा ठाकूर न्यायालयात आल्यानंतर त्या जाण्याच्या घाईत असल्याचे दिसून आले. त्यांच्या वकिलांनीही त्या विमानतळावरून आल्या असून आता थेट रुग्णालयात जायचे असल्याचे नमूद केले. त्यावर न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तुम्ही ठीक आहात का? मागील वेळी तुम्ही प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते, अशी विचारणा न्यायालयाने केली. न्यायालयाच्या विचारणेनंतर प्रज्ञा ठाकूर यांनी आता किती दिवस रुग्णालयात थांबावे लागेल, हे डॉक्टर सांगतील, असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना आम्ही बोलावू तेव्हा न्यायालयात हजर रहा, असे सांगितले.

काय घडले होते 29 सप्टेंबर 2008 रोजी?

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांना अटक झाली होती. एनआयए विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा - सरकारविरोधात जनमत तयार करण्यासाठी भाजपचे 'प्रसार माध्यम' अभियान

Last Updated : Nov 24, 2021, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.