ETV Bharat / city

प्रभाकर साईल यांच्या वकिलाची एनसीबी अधिकाऱ्यांशी भेट; बोलवल्यास साईल हजर राहणार असल्याचे सांगितले

author img

By

Published : Nov 1, 2021, 5:05 PM IST

क्रूझ प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांनी मोठे गौप्यस्फोट केल्यानंतर ते कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी एनसीबीकडून मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. यावर आम्हाल पत्र मिळाले नाही, त्यामुळे यावर अधिक बोलणार नाही. तसेच, आम्हाला पर्सनली किंवा साईल यांच्या घरी एनसीबीने कुठलेही समन्स पाठवलेले नाही, असा दावा साईल यांचे वकील प्रभाकर इंगोले यांनी केला आहे.

Prabhakar Sail lawyer Prabhakar Ingole
प्रभाकर साईल समन्स प्रभाकर इंगोले दावा

मुंबई - क्रूझ प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर ते कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी एनसीबीकडून मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. यावर आम्हाल पत्र मिळाले नाही, त्यामुळे यावर अधिक बोलणार नाही. तसेच, आम्हाला पर्सनली किंवा साईल यांच्या घरी एनसीबीने कुठलेही समन्स पाठवलेले नाही, असा दावा साईल यांचे वकील प्रभाकर इंगोले यांनी केला आहे. त्याचबरोबर, साईल यांना किंवा त्यांच्या वकिलांना समन्स पाठवा, आम्ही चौकशीसाठी येऊ, असे पत्राद्वारे कळवल्याचे देखील वकील इंगोले यांनी सांगितले.

माहिती देताना पंच प्रभाकर साईल यांचे वकील

हेही वाचा - अजित पवारांनी पत्नी व मुलाच्या नावे बँकेत पैसे वळविले, सोमैयांचा आरोप

प्रभाकर साईल यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आणावे, अशा प्रकारचे पत्र एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिले होते. मात्र, प्रभाकर साईल यांना कुठलीही नोटीस का देण्यात आली नाही? असा सवाल देखील प्रभाकर साईल यांच्या वकिलाच्या मार्फत विचारण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबईतील एनसीबी अधिकारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. एनसीबी प्रभाकर साईल यांना जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलवणार तेव्हा ते हजर राहणार, ते फरार नसून मुंबईतच आहे, त्यांना मुंबई पोलिसांनी संरक्षण देखील दिलेले आहे, अशी माहिती प्रभाकर साईल यांचे वकील प्रभाकर इंगोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

प्रभाकर साईलचे आरोप काय?

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. के.पी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटींपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे साईल यांचा दावा आहे. आपण के. पी गोसावी याचा बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच, मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगही दिल्या होत्या, असेही प्रभाकर साईल यांनी सांगितले होते. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच, 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत मला तयार राहण्यास सांगण्यात आले. गोसावीने मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत त्यांचे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितले, अशी धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

हेही वाचा - ST Worker Strike : बेकायदेशीर संप पुकारणाऱ्या ५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.