मुंबई - एनसीबी अधिकारी, समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असून माझ्यासहीत कुटुंबाला संरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्रभाकर साईल याने मुंबई पोलीस मुख्यालयात गुन्हे शाखेचे प्रमुख मिलींद भांबरे यांच्याकडे केली. प्रभाकर साईल एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईचे साक्षीदार असलेल्या के.पी.गोसावी याचा सुरक्षारक्षक आहे. पोलीस आयुक्तालयातून साईल याला तक्रार देण्यासाठी पोलिसांनी सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी साईलला वाहनातून नेले आहे.
आज (दि. 25) सकाळी अकरा वाजता साईल यांनी पोलीस मुख्यालयात गुन्हे शाखेचे प्रमुख मिलिंद भांबरे यांची भेट घेतली. एनसीबीच्या छाप्यापूर्वी व नंतर काय झाले, याची संपूर्ण माहिती दिली. तसेच कुटुंबियांना संरक्षण मिळावे, अशी मागणी केल्याचे समजते.
सहार पोलीस ठाण्यात तक्रार
एनसीबी कारवाई विरोधात प्रभाकर साईल तक्रार नोंदवणार आहेत. मुंबई पोलीसांनी पोलीस वाहनातून त्यांना सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तक्रार दिल्यानंतर प्रभाकर साईल यास पोलिसांनी वाहनातून नेले.
प्रभाकर साईल हा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच होता
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याला कोर्टाकडून वारंवार जामीन अर्ज फेटाळला जात आहे. हे होत असतानाचा आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा मोठा खुलासा नुकताच किरण गोसावीचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल या व्यक्तीने केला आहे. प्रभाकर साईल हा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच होता. प्रभाकरने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणातील मोठे बिंग फोडले आहे.
वानखेडे यांना प्रकरण भोवणार..?
एनसीबीने ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली. के.पी. गोसावी याने क्रूझवरुन आर्यन खानला आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केले. आता क्रूझवरील छाप्याचे पंत असलेल्या के.पी. गोसावी याचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल याने गंभीर आरोप केले. एनसीबीची कारवाई सुरू असताना, के. पी. गोसावीने आर्यन खानला फोनवर संभाषण करण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ, फोटो साईल याने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. हे प्रकरण एनसीबी आणि समीर वानखेडे यांना भोवण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा - आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींचा सौदा, ड्रग्ज पार्टी प्रकरणातील 'पंच'चा गौप्यस्फोट