ETV Bharat / city

Vinayak Mete Death शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात निधन - जे जे रुग्णालयात होणार शवविच्छेदन

आज सायंकाळी विनायक मेटे यांचा पार्थिव एअरलिफ्ट करून बीडला त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल शिवसंग्राम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्या नेत्यांना आणि इतर नेते नागरिकांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी उद्या त्याचं पार्थिव बीडमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार उद्या संध्याकाळी चार वाजता विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

Vinayak Metes death
विनायक मेटे अंतिमसंस्कार
author img

By

Published : Aug 14, 2022, 1:14 PM IST

Updated : Aug 14, 2022, 4:11 PM IST

मुंबई शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा आज पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलच्या पुढे भातान बोगद्याजवळ गाडीचा अपघात होऊन अपघाती Vinayak Mete accident on highway मृत्यू झाला. विनायक मेटे Vinay Mete Body यांचे पार्थिव उद्या एअर लिफ्ट करून बीडला नेले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत आज सायंकाळी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे मुंबईला येत होते. मात्र त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र त्याआधी विनायक मेटे यांचे पार्थिव पनवेलच्या रुग्णालयातून मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी Vinayak Mete postmortem आणण्यात येणार आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर विनायक मेटे यांचा मुंबईतील वडाळा येथे असलेल्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव थोड्यावेळासाठी मुंबईत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंत्यदर्शनासाठी cremation on Vinayak Mete ठेवण्यात येणार आहे.

उद्या संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार आज सायंकाळी विनायक मेटे यांचा पार्थिव एअरलिफ्ट करून बीडला त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्यात येईल. शिवसंग्राम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्या, नेत्यांना आणि इतर नेते, नागरिकांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी उद्या त्याचं पार्थिव बीडमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार उद्या संध्याकाळी चार वाजता विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अपघातानंतर त्यांच्या निधनाची बातमी काळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासहित महाराष्ट्रातल्या सर्वात बड्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अपघाताची होणार चौकशी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी Maratha Reservation meeting आज मुंबईकडे निघाले होते. मुंबई पुणे मार्गावरील पनवेल येथील भातान भोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात मोठा शोक व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन Vinayak Mete Car accident झाले. या अपघाताची चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात मेटे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा vinayak mete death मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे विनायक मेटे कोण होते जाणून घ्या

Last Updated : Aug 14, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.