ETV Bharat / city

Mumbaio Corona : मुंबईतील 'या' ८ विभागात सरासरीपेक्षा दुप्पट पॉजिटिव्हिटी रेट - मुंबई पॉजिटिव्हिटी रेट बातमी

मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट ( Corona Thired Wave Under Control ) आटोक्यात आली आहे. गेले काही दिवस १०० हून कमी रुग्ण आढळून येत आहे. सध्या मुंबईमध्ये ०.०१ टक्के इतका पॉजिटिव्हिटी रेट ( Mumbai Corna Positivity Rate ) आहे. मात्र, पालिकेच्या २४ विभागापैकी ८ विभागात ०.०२ टक्के टक्के म्हणजेच सरासरीपेक्षा दुप्पट पॉजिटिव्हिटी रेट आहे.

Mumbai Positivity rate double
Mumbai Positivity rate double
author img

By

Published : Mar 3, 2022, 7:14 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट ( Corona Thired Wave Under Control ) आटोक्यात आली आहे. गेले काही दिवस १०० हून कमी रुग्ण आढळून येत आहे. सध्या मुंबईमध्ये ०.०१ टक्के इतका पॉजिटिव्हिटी रेट ( Mumbai Corna Positivity Rate ) आहे. मात्र, पालिकेच्या २४ विभागापैकी ८ विभागात ०.०२ टक्के टक्के म्हणजेच सरासरीपेक्षा दुप्पट पॉजिटिव्हिटी रेट आहे. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागापुढे या विभागातील पॉजिटिव्हिटी कमी करण्याचे आव्हान आहे.

कोरोना आटोक्यात, पॉजिटिव्हिटी रेट घसरला -

मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली होती. एकाच महिन्यात ही लाट आटोक्यात आली आहे. या लाटेदरम्यान जानेवारी महिन्यात रोज २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत होते. महिनाभरात लाट आटोक्यात आल्यावर रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या रोज सुमारे १०० रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत २० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या गेल्या आठवडाभराचा पॉजिटिव्हिटी रेट हा ०.०१ टक्के इतका नोंदवला गेला आहे.

या ८ विभागात पॉजिटिव्हिटी रेट दुप्पट -

मुंबईत ०.०१ टक्के इतका पॉजिटिव्हिटी रेट नोंदवला असला तरी महानगरपालिकेच्या २४ विभागापैकी ग्रांट रोड डी, बांद्रा एच वेस्ट, चेंबूर पूर्व एम ईस्ट, परेल एफ साऊथ, फोर्ट कुलाबा ए, खार एच ईस्ट, अंधेरी पश्चिम के वेस्ट, एल्फिस्टन जी साऊथ या आठ विभागात ०.०२ टक्के इतका पॉजिटिव्हिटी रेट नोंदवला गेला आहे. मुंबईमध्ये असलेल्या पॉजिटिव्हिटी रेट पेक्षा दुप्पट पॉजिटिव्हिटी रेट या आठ विभागात नोंदवला गेला आहे.

त्या विभागांवर विशेष लक्ष -

मुंबई शहरातील एकूण पॉजिटिव्हिटी रेटपेक्षा आठ विभागात पॉजिटिव्हिटी रेट दुप्पट नोंदवला गेला आहे. यामुळे हा रेट कमी करण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता या विभागावर विशेष लक्ष दिले जात आहे. कोरोना, कंटेनमेंट झोन तसेच क्वारंटाईन नियमांचे पालन योग्य प्रकारे केले जाते का यावर लक्ष दिले आहे. आढळून येणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करून पॉजिटीव्ह येणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल भरती किंवा क्वारंटाईन केले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

१० लाख ५६ हजार ६४९ रुग्णांची नोंद -

मुंबईत २ मार्चपर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ६४९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३६ हजार ३८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६८९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ५४०५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.

२० वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर, मार्च महिन्यात २ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Eknath Khadse On BJP : भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.