ETV Bharat / city

Mumbai Crime: डोंगरी येथे चिमुकलीचे लैंगिक शोषण; 58 वर्षीय वॉचमनवर पॉस्कोचा गुन्हा दाखल - 58 वर्षीय वॉचमनवर पॉस्कोचा गुन्हा दाखल

Mumbai Crime: डोंगरी परिसरात 58 वर्षीय वॉचमन 11 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. Mumbai Crime दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कृष्णाचार्यजी महाराज (58) असे या आरोपी वॉचमनचे नाव आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Oct 13, 2022, 10:33 PM IST

मुंबई: डोंगरी परिसरात 58 वर्षीय वॉचमन 11 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. Mumbai Crime दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कृष्णाचार्यजी महाराज (58) असे या आरोपी वॉचमनचे नाव आहे.

पीडित चिमुकलीच्या आईने डोंगरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. Mumbai Crime जबाबात पीडित मुलीच्या आईने असे सांगितले की, पती टॅक्सी चालक आहेत. त्यांच्या उत्पन्नातुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझ्या 2 मुली आहेत, त्या डोंगरी येथील शाळेत शिकत आहेत. शाळेच्या पाठीमागे जाऊ राहते. मुलींची शाळा दुपारी १ ते संध्याकाळी ६.५० वाजेपर्यंत आहे. आणि शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत तेथे ट्युशनला जात असतात. दोन्ही मुली शाळा सुटल्यानंतर आणि ट्युशन सुटल्यानंतर नातेवाईकांच्या घरी थांबतात. नंतर रात्री ८ वा. ते ८.३० वाजेच्या दरम्यान मुलींना घरी घेवुन जात असतात.

अशी घडली घटना १२ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता मुली शाळेत परिक्षा सुरू असल्याने त्यांना शाळेत सोडण्यात आले होते. तसेच मुलीची परिक्षा ३ वाजता संपल्यानंतर ती वहिणीच्या घरी जावुन थांबली व ट्युशन संपल्यानंतर रात्री ८ वाजता मुलींना घेण्यासाठी वहिणीच्या घरी गेले होते. त्यावेळी वहिनीने सांगितले की, ती साधरण संध्याकाळी ७ वाजता भाजी मार्केटमध्ये गेले होते. जाताना तिने ११ वर्षीय मुलीला ट्युशनवरून येईपर्यंत तिला घराबाहेर थांबून तिची वाट बघण्यास सांगितले होते. तिने घराला कडी लावत मार्केटला गेली होती. साधरण ७.३० वाजेच्या सुमारास वहिनी मार्केटवरून घरी आली. तेव्हा ११ वर्षीय मुलगी ही समोरिल बिल्डींगचे बांधकाम चालु आहे, तेथुन पळत घरी येत होती.

यावेळी वहिनीने तिच्याकडे विचारणा केली असता तिने सांगितले की, ती घरासमोर बसली होती. तेव्हा आजुबाजुस कोणी नसताना समोरीच्या बिल्डींगमध्ये वॉचमन काम करणारा वयस्कर इसमाने तिचा हात पकडुन टॅक्सीच्या आडोशयाला घेवुन गेला होता. तसेच त्याने तिला वाईट रितीने अश्लील स्पर्श केला असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने विश्वासात घेवुन तिच्याकडे आणखीन चौकशी केली असता तेव्हा तिने सांगितले की, तिला आरोपी वॉचमन घरासमोर बसली असताना तिला आवाज देवुन बोलविले.

पोलिसांना घटनेची माहिती दिली मुलीने जाण्यास नकार दिल्यावर वॉचमन याने तिचा हात पकडून बिल्डींगच्या बाहेर ज्याठिकाणी तो बसतो, त्याच्या समोरील एका टॅक्सीच्या आडोशाला तिला घेवुन गेला व तिच्याशी अश्लील चाळे केले आहे. नंतर घाबरलेल्या मुलीने वॉचमनचा हात सोडवुन पळत घरी आली. ही माहिती समजताच आईने १०३ नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलविले. काही वेळाने पोलीस आले पोलिसांनी वॉचमनला पकडुन पोलीस ठाण्यात घेवुन आले आहे. आरोपी वॉचमन स्वामी कृष्णाचार्यजी महाराजला चौकशीअंती अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.