ETV Bharat / city

Breaking : नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध - देवेंद्र फडणवीस

Breaking
Breaking
author img

By

Published : Nov 9, 2021, 6:52 AM IST

Updated : Nov 9, 2021, 3:13 PM IST

15:12 November 09

जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन

जळगाव ब्रेकिंग

एसटी बसला दुधाने अभिषेक घालून, पूजा-अर्चा करून राज्य सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी केली प्रार्थना

एसटी बस ही शहरी व ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे म्हणत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची केली विनंती

राज्य सरकारला सद्बुद्धी येऊन एसटी महामंडळावरची ईडा पिडा दूर होवो अशी प्रार्थना देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनावेळी केली

12:58 November 09

चार जमीन व्यवहरांचा अंडरवर्ल्डशी संबंध, त्यात नवाब मलिक यांचाही संबंध - देवेंद्र फडणवीस

  • नवाब मलिकजी २००३ मध्ये हा व्यवहार सुरू झाला आणि २००५  मध्ये हा व्यवहार संपला. तेव्हा नवाब मलिक मंत्री होते.
  • मलिक तुम्ही गुन्हेगारां कडून जागा कशी विकत घेतली. ती सुद्धा इतक्या स्वस्तात. या आरोपींवर टाडा लावला गेला होता. मग ही संपत्ती जप्त केली जाऊ शकते, म्हणून ती तुम्ही विकत घेतली का? - देवेंद्र फडणवीस
  • मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. अशा अजून ५ जमीनींचे व्यवहार आहेत, त्यातील ४ मध्ये अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. हे सर्व कागदपत्र  तपास संस्था आणि शरद पवार यांना ही देणार आहे.

12:50 November 09

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध - देवेंद्र फडणवीस

  • दुसरा मनुष्य सलीम पटेल हा आहे. दाऊद बरोबर याचा फोटो आहे. हा हसीना पारकरचा सुरक्षा रक्षक होता. हसीना पारकरला जेव्हा २००८ मध्ये अटक झाली तेव्हा सलीम पटेल यालाही अटक झाली होती. जमीन हस्तगत करण्याचा जो व्यवसाय चालायचा त्या मध्ये सलीम पटेल होता.
  • कुर्ला येथे १ लाख २३ हजार स्क्वेअर फूट जागा एलबीएस रोड येथे आहे. ही जागा सोलिदास इंव्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाने रजिस्ट्री झाली आहे.  ही कंपनी नवाब मलिक यांची आहे. फरहाज मलिक यांनी ही जागा विकत घेतली आहे.
  • २००५ ला याची खरेदी २०५३ रुपये प्रति स्क्वेअर फूट ने ३० लाख रुपयांत खरेदी केली आहे .
  • सलीम पटेल याच्या खात्यात १५ लाख रुपये व  शहाब अली खान याच्या खात्यात १० लाख रुपये गेले आहेत.

12:45 November 09

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद सुरू

  • माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद मराठी ऐवजी हिंदी मध्ये - देवेंद्र फडणवीस
  • मी घोषणा केली होती दिवाळी नंतर मी बोलणार. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद ची स्टोरी नाही तर खूप महत्वपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती आहे.
  • सरदार शहाब आली खान हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व महानगर पालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा यांची रेकी त्याने केली होती, टायगर मेमनच्या घरी बैठकीत तो होता. त्याला मरेपर्यंत जन्मठेप झाली आहे.

12:40 November 09

चारवर्षीय मुलगी दहा फूट खोल खड्यात पडली, बचाव कार्य सुरु

  • शिर्डी (अहमदनगर) - कोपरगावातील कातकाडे पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या कंपाऊडसाठी खोदलेल्या खड्यात पडली मुलगी
  • चार वर्षाय ईश्वरी संतोष गंगावने असे मुलीचे नाव, दहा फुट खोल खड्यात पडलेल्या मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु
  • घटनास्थळी पोलीस महसुल फैजफाट्या सह दाखल दोन जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदन्याचे काम सुरु

12:27 November 09

भीमा कोरेगाव दंगल प्रकरण : चौकशी आयोगाला कार्यालय मिळाले, 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणार सुनावणी

  • मुंबई - भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणार सुनावणी
  • आयोगाला कार्यालयासाठी अखेर राज्य सरकारकडून जागा देण्यात आली
  • आयोगाला कार्यवाही करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे जागा देण्यात आली आहे

11:45 November 09

शरद पवारांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट, मुंबई पोलीस आयुक्तांची ही होती उपस्थिती

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे देखील उपस्थित होते. 

11:42 November 09

...तर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार - अनिल परब

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार तोडगा काढत आहोत. तरीही कोणी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे संकेत मंत्री अनिल परब यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

10:59 November 09

अल्पवयीन मुलीचा छळ केल्या प्रकरणी कचरा वेचणाऱ्याला अटक

मुंबई - सायन रुग्णालयात एका ८ वर्षीय मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचा छळ केल्या प्रकरणी कचरा वेचणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे. 

10:01 November 09

सायन कोळीवाडा येथील महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत तीन घरे कोसळली, नऊ जणांना ढिगाऱ्याखालून काढले

मुंबई - सायन कोळीवाडा येथील कोकरी आगर, महाराष्ट्र नगर झोपडपट्टी येथे आज सकाळी तीन घरे कोसळली. ही घटना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली

09:24 November 09

संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला

मुंबई - शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या  मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी गेले आहेत. 

  • उभय नेत्यांमधील ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
  • पवार - राऊत भेटीत राज्याच्या  परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • भाजपाकडून लावण्यात येणारे आरोप,  एसटी कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे

09:04 November 09

अँटिलिया येथे संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथे संशयितरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.  

- ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे तो पर्यटक असून त्याला अँटिलिया बघायचे होते.

-  पोलिसांकडून त्या व्यक्तीचा तपास सुरू आहे.

- पोलीस त्याची ओळखपत्रे आणि दावे तपासत आहेत.

09:00 November 09

पुणे : पिसोळे येथे दगडे वस्तीतील लाकडी वस्तूंच्या गोडाऊनला आग, मोठे आर्थिक नुकसान

पुणे -  पुण्यातील पिसोळी येथे दगडे वस्तीत असलेल्या एका लाकडी सामानाच्या (फर्निचर) गोडाऊनला आग लागली होती. पुणे व पीएमआरडीएच्या 14 अग्निशमन वाहन व जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सकाळपासून कुलिंगचे काम सुरू आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही. मात्र या ठिकाणी असलेले सर्व साहित्य जळून राख झाले आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा आहे.  

08:52 November 09

नवाब मलिक यांची आज दुपारी पत्रकार परिषद, कोणते नवीन खुलासे करतात याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. क्रुझ ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत रोज नवीन खुलासे करणारे मलिक आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

06:21 November 09

पूनम पांडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले

अभिनेत्री पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला काल मुंबईत अटक करण्यात आली होती. पूनम पांडेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Last Updated : Nov 9, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.