ETV Bharat / city

पटोले-पवारांच्या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापणार? - mahavikas aaghadi news

स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार असल्याचे पटोले यांनी म्हटले होते. यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अपण छोट्या नेत्यांच्या वक्तव्यावर बोलत नाही. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची आपल्याला गरज वाटत नाही, असे पवार म्हणाले होते.

sharad Pawar
sharad Pawar
author img

By

Published : Jul 13, 2021, 8:44 PM IST

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही अलबेल आहे, असे म्हणता येणार नाही, अशी सध्या परिस्थिती दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली असल्याचे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्याला सहकार्य करत नसल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले यांना सांगितले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली शक्ती वाढवण्यासाठी स्वबळावर प्रयत्न करावेत असे निर्देश पटोले यांनी पुण्यात दिले होते. तसेच स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार असल्याचे पटोले यांनी म्हटले होते. यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अपण छोट्या नेत्यांच्या वक्तव्यावर बोलत नाही. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची आपल्याला गरज वाटत नाही, असे पवार म्हणाले होते. सोनिया गांधी काही बोलल्या तर आपण त्यावर बोलू असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले होते.

हेही वाचा - आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष नाही - शरद पवार

'आपल्या वक्तव्याचा विपर्यास'

पवारांच्या या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी आपली बाजू सावरुन घेत आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून ते पसरवले जात असल्याचा माध्यमांच्यावरच आरोप केला. आपण कुणावर काही आरोप केला नव्हता असे ते म्हणाले. तसेच ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे पक्षवाढीसाठी स्वबळाचा नारा देतात, त्यावेळी कुणी काही बोलत नाही मात्र आपण असे काही बोलले तर त्याबाबत विपर्यास केला जातो, असे पटोले म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप हेही मुंबईत स्वबळावर निवडणुका लढवणार असे अनेकदा म्हटले आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलने करून चांगलीच तयारी सुरू केली आहे.

'महाविकास आघाडीत समन्वय नाही'

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचे दिसत असल्याचे या सर्व वक्तव्यांवरून दिसत असल्याचे भाजपाने म्हटले आहे. पवारांचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान असल्याचे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मनात कापरं भरली असावी. त्यामुळेच ते नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवत असावे, असे नानांच्या वक्तव्यातून वाटत असल्याचा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते नागपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवण्याची गरज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना का भासत आहे, याचे उत्तर तेच देऊ शकतात, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात तीन पक्षांची टगेगिरी सुरू आहे; आमदार आशिष शेलारांचा आरोप

विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न

राज्यामध्ये तीन पक्षाचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांची तीनवेळा भेट झाली आहे. त्यातच आज प्रशांत किशोर यांनी नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार देशभरात विरोधकांची एकच वज्रमूठ बांधता येते का, याची चाचपणी करताना दिसत आहेत. मात्र राज्यामध्ये तीन पक्षाचे सरकार असताना या तीनही पक्षात परस्परविरोधी वक्तव्यांमुळे समन्वय नसल्याचे दिसत आहे.

काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

एकूणच या राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यातील सत्तेमध्ये ते एकत्र आहेत. मात्र एखादी निवडणूक आली की ते स्वबळाचा नारा देताना दिसतात. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफुस असल्याचेच दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.