मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात Monsoon session आज दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू असताना माजी मंत्री छगन भुजबळ Former minister Chhagan Bhujbal यांनी सध्या राज्यात दाढीचे राज्य आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दाढीवाला मुख्यमंत्री लाभला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या CM Eknath Shinde beard दाढी विषयी चर्चा केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis म्हणाले की भुजबळजी आपल्यालाही दाढी आहे, त्यामुळे आपण दाढीवर टिप्पणी करणे योग्य नाही. दाढीची चर्चा विधानसभेत चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले.
'सफेद दाढीला देशात महत्त्व' प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की माझी दाढी ही सफेद दाढी आहे. सध्या देशात सफेद गाडीला फार महत्त्व आहे, हे तुम्ही विसरू नका, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला. यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यामुळे आज विधानमंडळ परिसरात या दाढींची चर्चा बराच काळ रंगली होती.
हेही वाचा - Maharashtra Monsoon Session मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ