ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: सागर बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग; भाजप नेत्यांची चुप्पी? - BJP leaders waiting for opportunity

राज्यात राजकीय घडामोडींना वेग ( political developments in state )आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत.

sagar-bungalow
sagar-bungalow
author img

By

Published : Jun 27, 2022, 4:59 PM IST

Updated : Jun 27, 2022, 5:14 PM IST

मुंबई - राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena Rebel MLA Eknath Shinde ) यांनी बंडखोरी केल्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस ( Opposition Leader of Devendra Fadnavis ) यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत.

राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष?

मागील सहा दिवसांपासून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे सागर हे निवासस्थान महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू बनले आहे. त्याच अनुषंगाने आज देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेते गिरीश महाजन ( Girish Mahajan ) , अशिष शेलार ( Ashish Shelar ) , प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ), प्रसाद लाड, राणा जगजीतसिंह पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह हे सर्व नेते उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या सध्याच्या नाट्यमय घडामोडीवर हे सर्व नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याशिवाय भाजपच्या पुढच्या वाटचालीसाठी चर्चा करण्यासाठी जमले आहेत.

हेही वाचा - नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना मोठा दिलासा : 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत लेखी उत्तर देण्याची मुभा - सर्वोच्च न्यायालय

घडामोडींना वेग मात्र नेत्यांची चुप्पी?

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात नवीन सत्तास्थापन होईल. भाजपसोबत एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येऊन नवीन सत्ता राज्यात स्थापन होईल अशा आशेने भाजप नेते संधीची वाट पाहत आहेत ( BJP leaders waiting for opportunity ) . त्या अनुषंगाने या सर्व घडामोडीवर देवेंद्र फडवणीस जातीने लक्ष ठेवून आहेत. या सर्व घडामोडी होत असताना सावधाणीचे पाऊल म्हणून भाजपचा एकही नेता माध्यमांशी बोलायला तयार नाही आहे. किंवा मौन राखण्याचे त्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण या प्रसंगी होणारी प्रत्येक घडामोड ही भाजपसाठी महत्त्वाची आहे आणि अशा अनुषंगाने एखादं चुकीचं वक्तव्य सुद्धा पक्षासाठी त्रासदायक ठरू शकतं.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद केली होती रद्द !

वरिष्ठ नेत्यांपैकी एखाद्या नेत्याचं वक्तव्य सध्याच्या राजकीय घडामोडींवर दिशाभूल करणारे ठरू शकतं या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांना यावर बोलण्यास पाबंदी करण्यात आलेली आहे. ठाकरे परिवार विशेष करून उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार प्रहार करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चार दिवसांपूर्वी ठरवण्यात आलेली पत्रकार परिषद सुद्धा भाजपकडून अचानक रद्द करण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालनामध्ये बोलताना आम्ही फक्त दोन ते तीन दिवस विरोधात बसणार आहोत अशा पद्धतीच वक्तव्य केलं होतं, त्यावरूनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना समज देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - Rebel minister out of cabinet : बंडखोर मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग...

Last Updated : Jun 27, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.