ठाणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( ShivSena Leader Eknath Shinde ) यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ घडून ( Political Crisis in Maharastra ) आली आहे. शिवसेनेतील 35 आमदारांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांसह शिवसेना आता आक्रमक झाली आहे. शिवसेना अॅक्शन मोडवर आल्याने, अनेक बंडखोर आमदारांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. काहींचे बॅनर फाडण्यात आले, त्याला काळे फासण्यात आले. बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर दगडफेकसुद्धा करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक झाली. याच पार्श्वभूमीवर खुद्द एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहले आहे. आमच्या कुटुंबीयांना काही झाले तर याची जबाबदारी तुमची, शरद पवार, संजय राऊतांची असणार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे काहीही बरेवाईट झाले तर याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असणार आहात. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपण रोखावे आणि आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करावी, त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी.
एकनाथ शिंदेच्या घराबाहेर पोलीस आणि समर्थकांची गर्दी : शिवसेनान नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल्यानंतर तसेच त्यांनी समर्थकांना आवाहन केल्यानंतर त्यांच्या समर्थकांची गर्दी त्यांच्या घराबाहेर दिसू लागली आहे. तसेच, कुटुंबाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेचं बंड, शिवसैनिकांची तोडफोड; मुंबईत 'या' तारखेपर्यंत जमावबंदी लागू