पणजी : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे आढळून आले. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राजकीय वातावरण चांगलेच ( Political Crisis in Maharastara ) तापले आहे. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यपालांना फ्लोअर टेस्ट ( Floor Test ) करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील सर्व सर्व बंडखोर आमदार आता गुवाहाटीतून पणजी येथील ताज कन्व्हेन्शन हाॅटेलमध्ये ( Taj Convention Hotel ) दाखल झालेले आहेत. दोन खासगी बसमधून सर्व आमदार पणजी येथील ताज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतदेखील या हॉटेलमध्ये पोहचलेले आहेत. त्यांची सर्व जबाबदारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांच्यावर देण्यात आली आहे. ते सर्व जबाबदारी पार पाडत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला हाॅटेलच्या व्यवस्थेचा आढावा : शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी रात्री गोव्यात दाखल झाले. शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर या आमदारांचा आगमन झाले असून. हे सर्व बंडखोर आमदार पणजीनजीक असणाऱ्या दोना पावला येथील ताज कान्व्हेन्शन सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉटेल परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनांची कसून चौकशी करीत असून, संशयित वाहनांना माघारी पाठवत आहेत. गोव्याचे पोलीस अधीक्षक स्वामी सक्सेना यांच्या देखरेखीखाली ही सर्व पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत. महासंचालक जसपाल सिंह यांनी नुकतीच भेट देऊन हॉटेल परिसराच्या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सर्व आमदारांची भेट घेतली असून, त्यांनी पोलीस अधिकारी व हॉटेल प्रशासन यांच्याशी चर्चा करून सुरक्षा व इतर परिस्थितीविषयी आढावा घेतला. या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था पणजीतील ताज हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
बहुमत चाचणीसाठी मुंबईत होणार दाखल : शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार बुधवारी रात्री दहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत. आमदारांची राहायची व्यवस्था पणजीतील ताज कन्व्हेन्शन सेंटर अँड रिसॉर्ट या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. गुरुवारी बहुमत चाचणीसाठी हे सर्व आमदार पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. हॉटेल परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आला आहे. गुरुवारी बहुमत चाचणीसाठी हे सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. तत्पूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून या सर्व आमदारांना गुवाहाटीतून गोव्यात आणण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली आमदारांची भेट : मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बुधवारी रात्रीच सर्व आमदारांची हॉटेलमध्ये भेट घेतली असून, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चादेखील केली आहे. गोव्यातील सर्व आमदारांची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री सावंत तसेच येथील स्थानिक भाजप भाजप सरकारवर देण्यात आली आहे. म्हणूनच सावंत यांनी हॉटेलला भेट देऊन सर्व सुरक्षा व आतील परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राज भवणावर;राज्यपालांकडे सादर केला राजीनामा