ETV Bharat / city

Raj Thackeray Hindu Jan Nayak : बाळासाहेबांसाराखी शाल पांघरून राज ठाकरे हिंदू जननायक होणार का? - बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे हिंदुत्व

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Hindutva) यांनी अंगावर शाल पांघरून आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Hindutva) यांच्याप्रमाणेच हिंदुत्वाचा आणि मशिदीवरील भोंगे (Loudspeakers Controversy) यांचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्र पेटवायला सुरुवात केली आहे. मात्र, यातून त्यांना काहीही साध्य होणार नाही. शाल पांघरून हिंदू जननायक (Raj Thackeray Hindu Jan Nayak) होता येणार नाही, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

raj thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Apr 30, 2022, 8:09 PM IST

Updated : Apr 30, 2022, 9:13 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा (Loudspeakers Controversy) पुढे करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, परप्रांतीयांचा मुद्दा असे काही मुद्दे हाती घेतल्यानंतर यश हाती येत नाही हे लक्षात आल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा (Raj Thackeray Hindutva Topic) हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी राज ठाकरे हे भाजपची भाषा बोलत आहेत. भाजपचा हिंदुत्वाशी (BJP Hindutva) साधर्म्य साधणारे त्यांचे मुद्दे आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपची बी टीम (Raj Thackeray BJP B Team) आहे, अशी टीकाही केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Hindutva) यांचे पुन्हा एकदा तुलनात्मक चित्र उभे केले जात आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच अंगावर शाल पांघरून त्यांच्याप्रमाणेच चष्मा लावून आपली प्रतिमा हिंदू जननायक (Raj Thackeray Hindu Jan Nayak) म्हणून जनमानसात रुजवण्याचा नवा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हाती घेतलेले मुद्दे आणि त्यांना राजकीय जीवनामध्ये मिळालेले यश यांची कारणे आणि राज ठाकरे यांना अपयश मिळाल्यानंतर त्यांनीही आपला लुक बदलून यश पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. यासंदर्भात काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

शाल पांघरून मूळ आकृती होता येणार नाही - राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे अंगावर शाल पांघरून आपले नवे चित्र समोर आनले आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विचारशैलीत खूप मोठा फरक आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसांच्या मुद्द्यांची आणि प्रश्नांची जाण होती. त्यांचे हिंदुत्व हे खरे होते बेगडी नव्हते. त्यांना कधीही दुसऱ्या कुणाच्या आधाराची गरज भासली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चेपणाला मराठी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद राज ठाकरे यांना मिळणार नाही कारण राज ठाकरे हे बाळासाहेबांची सावली आहेत, ते मूळ आकृती कधीही होऊ शकणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव एच देसाई यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांची धरसोड वृत्ती मतदानात परिवर्तित होणार नाही - राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणामध्ये आपला पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी अपयश आले आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांची धरसोड वृत्ती. राज ठाकरे यांनी एकही मुद्दा तडीस नेला नाही. त्यांनी कधी मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला, कधी बेरोजगारांचा हाती घेतला, कधी टोलचा घेतला मात्र हे मुद्दे संपल्यानंतर आता बाळासाहेबांनी हाती घेतलेला भोंग्यांचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मात्र, केवळ बाळासाहेबांची नक्कल करून त्यांना पुढे जाता येणार नाही. मतदार त्यांना प्रतिसाद देत नाही हे गेल्या अनेक निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे आणि ते पुढेही होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांचा केमिकल लोच्या - राज ठाकरे हे कधीही हिंदुह्रदयसम्राट किंवा हिंदू जननायक होऊ शकत नाहीत. कधी आपल्या पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलून, कधी इंजिनाचे डबे बदलून, तर कधी हिंदुत्वाचा नारा देत राज ठाकरे यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता त्यांनी बाळासाहेबांप्रमाणे अंगावर शाल पांघरून जर सभेला जाताना हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत असतील तर त्यांना जनता गांभीर्याने घेणार नाही, त्यांचा केमिकल लोच्या झाला अशी, टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार प्राध्यापिका मनीषा कायंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Replied To Raj Thackeray : '...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो', शरद पवारांचे प्रत्युत्तर

शिवसेनेची राजकीय वाटचाल - मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून १९६६ साली मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेने सुरुवातीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला काँग्रेसबरोबर शिवसेनेने काही वर्ष घरोबा केला. प्रजा समाजवादी पक्षाबरोबर ही शिवसेनेचे सूत जुळले होते. कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा शिवसेनेकडून मुंबईत झालेला खून त्यानंतरच शिवसेनेला विधान भवनात प्रवेश मिळाला आणि त्यांचा पहिला आमदार निवडून आला. 1985 पर्यंत शिवसेनेचे विधानसभेचे एक किंवा दोन आमदार निवडून येत होते. मात्र शिवसेनेच्या गावागावात झालेल्या शाखा आणि शिवसेनेने घेतलेला मराठी माणसांचा आणि परप्रांतीयांचा मुद्दा, पाकिस्तान विरोधात घेतलेला आक्रमक मुद्दा यामुळे शिवसेना हातपाय पसरू लागली. 1990 च्या निवडणुकीमध्ये भाजपाशी युती करून शिवसेनेने १८३ जागा लढवल्या आणि त्यांना ५२ जागा मिळाल्या. १९९५ मध्ये २६९ जागा लढवून ६९ जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने सत्तेत प्रवेश केला. १९९९ मध्ये १६१ जागा लढवून पुन्हा शिवसेनेला ६९ जागा मिळाल्या. २००४ च्या निवडणुकीत १६३ जागा लढवून शिवसेनेच्या पदरात ६२ जागा पडल्या, तर शिवसेनेची लोकप्रियता या निवडणुकीपासून कमी होऊ लागली २००९ मध्ये १६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला केवळ ४४ जागांवर समाधान मानावे लागले. २०१४ मध्ये शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली २८२ जागा लढवूनही त्यांना ६३ जागा मिळाल्या, तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना १२६ जागा लढवून ५६ जागांवर विजय मिळवला.

मनसेची राजकीय वाटचाल? - महाराष्ट्र नवनिर्माण सेना २००७ मध्ये राजकीय पटलावर उदयास आली. राज ठाकरे यांच्या वकृत्तवावर आणि तरुणांमध्ये असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे हा पक्ष लवकरच जनमानसात रुजला आणि त्यांना मतदारांकडून ही चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने घवघवीत यश मिळवीत १३ जागांवर विजय संपादन केला. एखाद्या नवख्या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरत केलेली ही कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपली राजकीय घोडदौड फार राखता आली नाही, त्यानंतर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत मनसेने २७ नगरसेवक निवडून आणले. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मुंबई महानगर पालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही मनसेला सात जागा जिंकता आल्या. एकूणच मतदारांनी मनसेला मतांच्या माध्यमातून नाकारल्याचे चित्र समोर आले. जनता राज ठाकरे यांची भाषणे ऐकण्यासाठी गर्दी करते. मात्र, त्यांना मतांच्या माध्यमातून दान देत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. आता पुन्हा एकदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी याचा फायदा त्यांना होईल की भाजपाला हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा - Bhaskar Jadhav On Raj Thackeray : राज ठाकरे अयोध्येत योगींच्या 'टकल्याला' शाई लावणार का? - भास्कर जाधवांचा सवाल

Last Updated : Apr 30, 2022, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.