मुंबई - राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार विरोधात पोलीस अधिकारी संजय पांडे उच्च न्यायालयात जाणार आहेत. रजनीश सेठ यांच्या पोलीस महासंचालक पदाच्या नियुक्तीवरून पांडे हे उच्च न्यायालयात जाणार आहेत.
हेही वाचा - परमबीरसिंग सर्वोच्च न्यायालयात तर आयपीएस संजय पांडे जाणार मुंबई उच्च न्यायालयात
आपल्याला डावलून रजनीश सेठ यांना राज्य सरकारने अतिरिक्त पदभार दिल्याने संजय पांडे हे नाराज होते. सिनियर असल्याने पोलीस महासंचालक पद आपल्याला मिळावे म्हणून संजय पांडे आग्रही होते. संजय पांडे यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळमध्ये डीजी म्हणून राज्य सरकारने नियुक्त केले आहे.
हेही वाचा - वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे मुख्यमंत्र्यांवर नाराज; सुट्टीवर गेले
कोण आहेत संजय पांडे?
1986 च्या आयपीएस बॅचचे असलेले संजय पांडे हे पोलीस महासंचालक पद व मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, होमगार्डचे महासंचालक पद सांभाळत असलेल्या संजय पांडे यांची वर्णी पोलीस महासंचालक पदी किंवा मुंबई पोलीस आयुक्तपदी लागली नसल्यामुळे ते नाराज होऊन सुट्टीवर गेले आहेत. रजनीश सेठ 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या संजय पांडे यांना या पदासाठी निवड करण्यात न आल्यामुळे पोलीस विभागांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.