ETV Bharat / city

लॉकडाऊनचा फायदा घेत 'त्याने' कमाविले 49 लाख, आरोपी अटकेत

लॉकडाऊन काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीला मुंबईतील मंडाळा मानखुर्द येथील इंदिरा नगर येथून अटक करण्यात आलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 5 लाख 53 हजार रुपयांचा प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

mumbai latest news  mumbai lockdown crime  mumbai crime news  मुंबई लेटेस्ट न्यूज  मुंबई लॉकडाऊन क्राईम  मुंबई क्राईम न्यूज
लॉकडाऊनचा फायदा घेत 'त्याने' कमाविले 49 लाख, आरोपी अटकेत
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:28 PM IST

मुंबई - लॉकडाऊन काळात एकीकडे अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत, तर हजारो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, याच लॉकडाऊनचा फायदा घेत एका व्यक्तीने गैरमार्गाने तब्बल 49 लाख रुपये कमवले आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली आहे.

लॉकडाऊनचा फायदा घेत 'त्याने' कमाविले 49 लाख, आरोपी अटकेत

लॉकडाऊन काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीला मुंबईतील मंडाळा मानखुर्द येथील इंदिरा नगर येथून अटक करण्यात आलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 5 लाख 53 हजार रुपयांचा प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आरोपीकडून लॉकडाऊन काळात विकण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून कमावलेल्या तब्बल 49 लाख 14 हजार रुपयांची मुद्दल सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने लॉकडाऊन काळात मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, बैगांवाडीसारख्या परिसरात असलेल्या पान टपरी चालकांना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची चढ्या भावाने विक्री करून त्याद्वारे 49 लाख रुपये एवढी रक्कम जमवली. याप्रकरणी पोलिसांनी राजेश राम कुमार गुप्ता ( 28) या आरोपीला अटक केली आहे. या आरोपींच्या पोलीस चौकशीत त्याच्या विरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारचे 5 गुन्हे या अगोदरही दाखल असल्याचे समोर आलेला आहे.

तंबाखूजन्य पदार्थ चढ्या भावाने विकून मिळवलेली 49 लाखांची एवढी मोठी रक्कम तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी घेऊन जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ला मिळाली होती. त्यानंतर 19 जूनला रात्री उशिरा सापळा रचून पोलिसांनी आरोपीला मुद्देमाल व रोख रकमेसह अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.