ETV Bharat / city

Silver Oak ST Workers Agitation : शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करणाऱ्या 107 एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Sharad Pawar residence Silver Oak

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्याविरोधात नारेबाजी करत त्यांच्या घरासमोर चपलफेक, दगडफेक ( ST Worker Agitation At Silver Oak ) केली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. या आंदोलनातील 107 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये 25 महिलांचा समावेश आहे.

Police Arrested ST Workers
107 एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Apr 8, 2022, 7:52 PM IST

मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज आक्रमक स्वरुप ( ST Workers Protesting ) मिळाले. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर धडक ( ST Worker Agitation At Silver Oak ) दिली. या आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्याविरोधात नारेबाजी करत त्यांच्या घरासमोर चपलफेक, दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. या आंदोलनातील 107 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये 25 महिलांचा समावेश आहे. सध्या सर्व आंदोलक यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात आहेत.

आंदोलकांना ताब्यात घेतले - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर बाटल्या आणि चपलाही फेकल्या गेल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच मुंबई पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या सर्व आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

आंदोलकावरील कारवाईवर सर्वांचे लक्ष - गुरुवारी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे आज असे काही आंदोलन होईल याची कल्पना पोलिसांना किंवा अन्य कुणालाच नव्हती. दुपारी अचानकपणे एसटी कर्मचारी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. अचानकपणे सुरु झालेल्या या आंदोलनामुळे पोलीसही काही काळ चक्रावून गेले होते. या संपूर्ण प्रकारानंतर मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. आता आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अनेक प्रश्न उपस्थित - एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना कशी लागली नाही? मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली का? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचारी धडकले. त्यांनी पवारांच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली. चप्पल आणि बाटल्या फेकल्या. त्या नंतर मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न - एसटी कर्मचारी पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यांनी ब्रीड कॅन्डी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवार सिल्व्हर ओकवर उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घरातून बाहेर पडत एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शांततेचं आवाहन केलं. एसटी कर्मचारी आक्रमक होते. सुप्रिया सुळे यांनाही घेरण्याचा यावेळी प्रयत्न झाला. शेवटी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना एका शाळेच्या बसमधून जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा - ST Worker Agitation At Silver Oak : शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.