मुंबई जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है २६/११ की नई ताजी याद दिलाएगा, असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला Mumbai Traffic Police Control Room शुक्रवारी रात्री आला. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा व सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी रात्रभर कारवाई सुरु होती. मुंबई पोलीस सतर्क झाले असून, मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात Police alert security increased आली आहे. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर Mumbai CP Vivek Phansalkar यांनी दिली.
पाकिस्तानातील नंबरवरून शुक्रवारी रात्री ११ वाजुन ४५ मिनीटांनी वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला. या धमकी प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा देखील करणार आहे. एटीएससोबत आम्ही माहिती शेअर करत आहोत. इतर सर्व गोष्टी सुरळीत असल्याचे आश्वासन मी मुंबईकरांना देऊ इच्छितो, त्यांनी घाबरून जाऊ नये. मुंबई पोलीसांनी धमकीचे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपास सुरू आहे, असे फणसाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला शुक्रवारी रात्री, २६/११ प्रमाणे हल्ल्याची धमकी मिळाली असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाच्या WhatsApp वर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. त्याचे लोकेशन ट्रेस केल्यास ते भारताबाहेर असल्याचे आढळून येईल, असे मेसेंजरने सांगितले होते. मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेशवाहकाने दिली होती.
हेही वाचा Threat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी