ETV Bharat / city

PM Modi Raj Bhavan Mumbai :'...आणि आज त्याच बंकरला क्रांतिकारकांचे नाव ही अभिमानाची बाब' - राजभवनातील बंकरचा इतिहास

राज्यातील क्रांतीकारकांचे हे संग्रहालय नव्या पिढीला प्रेणादायी असेल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi Mumbai ) यांनी काढले. पंतप्रधान मोदींनी राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन ( Inauguration of Gallery at Raj Bhavan ) केले. यावेळी ते बोलत होते. राजभवनातल्या बंकरचा 75 वर्षात पत्ता लागला नाही हे दुर्दैवी, असल्याचे मतही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

PM Modi Raj Bhavan
PM Modi Raj Bhavan
author img

By

Published : Jun 14, 2022, 7:17 PM IST

Updated : Jun 14, 2022, 7:40 PM IST

मुंबई - राजभवनात क्रांतीकारक गॅलरीचे निर्माण करण्यात आले असून हे संग्रहालय आता जनसामान्यांना प्रेणादायी ठरेल आणि राज्यातील क्रांतीकारकांचे हे संग्रहालय नव्या पिढीला प्रेणादायी असेल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi Mumbai ) यांनी काढले. पंतप्रधान मोदींनी राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन ( Inauguration of Gallery at Raj Bhavan ) केले. यावेळी ते बोलत होते. हे बंकर आजपर्यंत कोणाला माहितही नव्हते. कधी काळी याच बंकरमध्ये दारुगोळा ठेवून आमच्या क्रांतिकारकांना संपवण्याची रणनिती आखली जात होती. आज त्याच बंकरला क्रांतिकारकांचे नाव दिले जात आहे. ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे मत पंतप्रधानांनी यावेळी बोलून दाखविले.

बंकरचा इतिहास दर्शविणारे माहितीपट

जल भूषण इमारत ही १८८५ पासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. ही इमारत जूनी झाल्याने ती पाडण्यात आली होती. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ऑगस्टमध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.

काय आहे क्रांतीकारक गॅलरी? : सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे. जलभूषण इमारतीत अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. या संग्रहालयामुळे राज्यातील क्रांतीकारकांचा इतिहास जनसामान्यांना पाहता येणार आहे. क्रांतीकारकांच्या या संग्रहालयात वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, १९४६ मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली या क्रांतीकारक गॅलरीत अर्पण करण्यात आली आहे.

असा आहे बंकर : सन 2016 साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जवळ जवळ 15000 चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले. आता हे बंकर सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालय तयार केले गेले असून त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षामध्ये राजभवनच्या इतिहासाची झलक देखिल दाखविली जाणार आहे.

असे झाले बळकटीकरण : अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्यक होते. या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतारा आहे.

'या' बाबींचा लागला शोध : बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार, शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शविणारे कक्ष तयार करण्यात आले असून त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी पाहता येणार आहे. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - PM Narendra Modi Dehu Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हणून जिंकली वारकऱ्यांची मने, पाहा संपूर्ण भाषणाचा VIDEO

Last Updated : Jun 14, 2022, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.