ETV Bharat / city

Plastic Ban Mumbai प्रतिबंधित प्लास्टिक बंदी मोहिमेत हॉटेल्स, रेस्टॉरंट पालिकेच्या रडारवर

मुंबईत ऑनलाईन फूड चैन आणि हॉटेल, रेस्टॉरंटकडून प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. प्लास्टिक विरोधी कारवाई Ban Plastic Action Mumbai आणखी तीव्र करण्यासाठी येत्या काळात हॉटेल्स, ऑनलाईन फूडवाले आता पालिकेच्या रडारवर असणार आहेत. त्याचाच भाग म्हणून हॉटेल इंडस्ट्रीचे प्रतिनिधीत्व करणारी आहार संघटना आणि ऑनलाइन फूड चैनच्या प्रतिनिधींची येत्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
author img

By

Published : Aug 17, 2022, 9:04 PM IST

मुंबई - प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. मुंबईत ऑनलाईन फूड चैन आणि हॉटेल, रेस्टॉरंटकडून प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. प्लास्टिक विरोधी कारवाई Plastic Ban Action Mumbai आणखी तीव्र करण्यासाठी येत्या काळात हॉटेल्स, ऑनलाईन फूडवाले आता पालिकेच्या रडारवर असणार आहेत. त्याचाच भाग म्हणून हॉटेल इंडस्ट्रीचे प्रतिनिधीत्व करणारी आहार संघटना आणि ऑनलाइन फूड चैनच्या प्रतिनिधींची येत्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्लास्टिकचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी तसेच प्लास्टिकला पर्याय आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.

१६०० किलो प्लास्टिक जप्त : मुंबईमध्ये २०१८ पासून प्लास्टिक बंदी आहे. त्यासाठी पालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई केली जात आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई थांबवण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे. १ जुलैपासून महापालिकेच्या बाजार आणि लायसन्स विभागाच्या कर्मचारी अधिकारी वर्गाकडून आतापर्यंत २४ हजार ठिकाणी भेटी दिल्या. या कारवाईत १६०० किलो प्लास्टिक जप्त करून ११ लाख ६५ हजार दंड वसुल करण्यात आला आहे. एकूण २३३ जणांवर पालिकेने या मोहिमेत कारवाई केली आहे.

संघटनांसोबत बैठका : पालिकेकडून सध्या सुरु असलेली कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. मुंबईमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड चैन यांच्याकडून प्लास्टिकचा वापर वाढला आहे. अन्नपदार्थ पोहचवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कंटेनर हे एकदाच वापरासाठीचे असतात. त्यामुळे वापरानंतर हे कंटेनर फेकावे लागतात. त्यामुळे या माध्यमातून प्लास्टिकच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. अशा प्रकारच्या प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणण्यासाठीच पालिकेने लक्ष वेधले आहे. यासाठी पालिका हॉटेल आणि रेस्टॉरंटची संघटना असलेल्या आहारसोबत बैठक घेऊन संवाद साधणार आहे. यात प्लास्टिकला काय पर्यायी अशा गोष्टींचा वापर करता येईल? याची चाचपणी करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्या अनुषंगाने हॉटेल इंडस्ट्रीला प्लास्टिकला पर्यायी काय गोष्टी देता येतील याचीही चर्चा यावेळी केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Vande Mataram Controversy जय हिंद की वंदे मातरम्, वाचा, नेमका काय आहे इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.