ETV Bharat / city

मुलांशी भावनिक संवाद अन् गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधन-सुविधांनुसार त्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Education Minister Varsha Gaikwad
Education Minister Varsha Gaikwad
author img

By

Published : Oct 4, 2021, 4:29 PM IST

मुंबई - आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधन-सुविधांनुसार त्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरू करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरू करू शकलो नाही, अशी खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.

सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ -

ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य व अध्ययन निष्प:ती चे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाईल. अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेत्तर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

हे ही वाचा -पुण्यात धक्कादायक प्रकार; फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला काढलं बाहेर

शाळा बंद पण शिक्षण सुरू -

मार्च २०२० पासून कोविड-१९ ची संसर्गता लक्षात आल्याने लॉकडाऊनमुळे शाळा तडकाफडकी बंद कराव्या लागल्यात. पण आपला शिक्षण विभाग मात्र निरंतर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून निरंतर कार्यरत राहिला आहे. याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून त्यांनी मागील १८ महिन्यात ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अत्यंत परिणामकारक उपक्रम राबवले आहेत. रेडिओ, दूरदर्शन, व्हॉटसअप, युटुयब, फेसबुक, गुगल क्लासरूम या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर करीत मुलांना त्यांच्या इयात्तानुरूप शिकत ठेवले आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

हे ही वाचा - शाळा सुरु करण्याचा निर्णय आव्हानात्मक; मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद

शिक्षण चक्र सुरु रहावे - डॉ. सुहास प्रभू

माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हा शासनाचा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्सने सूचविलेल्या सूचनांचे पालन करून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे चक्र असेच सुरु रहावे अशी भावना टास्क फोर्सचे सदस्य आणि जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. सुहास प्रभू यांनी व्यक्त केली. कोरोना कालावधीत जी मुले शाळा बाह्य झाली असतील त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज डॉ. प्रभू यांनी व्यक्त केली. पालक आणि शिक्षक यांनी सातत्याने संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शालेय शिक्षण विभागातर्फे शाळा सुरु होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या उपाय योजनांबद्दल अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी माहिती दिली. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित असलेल्या आयुक्त विशाल सोळंकी यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर विशाल गरड यांनी सूत्र संचालन केले. शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या ध्वनीचित्रफीतीचेही यावेळी अनावरण करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.