ETV Bharat / city

खड्ड्यांच्या फक्त 414 तक्रारी बाकी; पालिकेचा अजब दावा - पालिकेचा अजब दावा

पालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारींपैकी अवघ्या 414 तक्रारींचे निवारण करायचे बाकी असल्याचे दावा केला आहे. तर हा दावा खोटा असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

रस्त्यावर खड्डे
author img

By

Published : Aug 13, 2019, 11:54 PM IST

मुंबई - पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडतात. यंदाही रस्त्यावर खड्डे पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारींपैकी अवघ्या 414 तक्रारींचे निवारण करायचे बाकी असल्याचा दावा केला आहे.

तक्रार निवारण संदर्भातील प्रतिक्रिया

महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी महापालिकेच्या 'MCGM 24x7' अॅपवर 10 जूनपासून 2648 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पैकी 2334 खड्डे बुजवण्यात आले आहेत. तर हे प्रमाण प्राप्त तक्रारींच्या जवळपास 84 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडचा समावेश असलेल्या ए वॉर्डातील रस्त्यांवर अवघे पाच खड्डे शिल्लक आहेत. बी वॉर्ड म्हणजेच पायधुनी आणि कालबादेवी परिसरात ३० खड्डे असल्याच्या तक्रारी १० जूनपर्यंत आल्या होत्या. पैकी २९ खड्डे बुजवण्यात आले असून पालिकेच्या माहितीनुसार, या भागात फक्त एक खड्डा बुजवायचा बाकी आहे. तर अंधेरी पूर्व, सहार, मरोळ आणि साकिनाका परिसरात म्हणजेच के-पूर्व वॉर्डात सर्वाधिक ३७१ खड्डे असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील २८६ खड्डे बुजवण्यात आले आहेत. या वार्डात ८५ खड्डे बुजवायचे बाकी असून लवकरच तेही काम पूर्ण करण्यात येईल, असे पालिकेने सांगितले आहे. तसेच मुलुंड परिसरात १४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मुंलुंडमध्ये ९८ खड्डे असल्याच्या तक्रारी होत्या. पैकी ८४ खड्डे भरल्याची माहिती आहे.

दरम्यान, पालिकेचा हा दावा खोटा असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. पालिकेनं खड्ड्यांसंबंधीचा अहवाल वेबसाइटवर सार्वजनिक करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी केली. तसेच दर आठवड्याला स्थायी समितीच्या बैठकीत सुधारीत आकडेवारी सादर करावी. मुंबईत फक्त ४१४ तक्रारी असल्याचा दाव्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, पालिका प्रशासन खड्डे बुजवते. तसेच खड्डे बुजवणे हे पा लिकेचे कर्तव्य आहे. आतापर्यंत प्रशासनाने 84 ते 85 टक्के बुजवले आहेत. उरलेल्या तक्रारींची लवकरच दखल घेतली जाईल, अशी प्रतिक्रियी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

Intro:मुंबई - पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडतात. यंदाही रस्त्यावर खड्डे पाहायला मिळत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासनाने अवघ्या 414 तक्रारीची दखल घेण्याचे बाकी असल्याचे म्हटले आहे. रस्त्यावरील खड्ड्याबाबत पालिकेने एक आकडेवारी जाहीर केली आहे त्यात हा दावा करण्यात आला आहे. Body:महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी महापालिकेच्या 'MCGM 24x7' अॅपवर 10 जूनपासून 2648 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन 2334 खड्डे बुजवण्यात आले आहेत. जवळपास 84 टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडचा समावेश असलेल्या ए वॉर्डातील रस्त्यांवर अवघे पाच खड्डे आहेत. बी वॉर्ड म्हणजेच पायधुनी आणि कालबादेवी परिसरात ३० खड्डे असल्याच्या तक्रारी १० जूनपर्यंत आल्या होत्या. त्यातील २९ खड्डे बुजवले आहेत. पालिकेच्या माहितीनुसार, अवघा एक खड्डा बुजवायचा राहिला आहे. अंधेरी पूर्व, सहार, मरोळ आणि साकिनाका परिसरात म्हणजे के-पूर्व वॉर्डात सर्वाधिक ३७१ खड्डे असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील २८६ खड्डे बुजवले आहेत. ८५ खड्डे बुजवायचे असून, लवकरच तेही काम पूर्ण करण्यात येईल, असं पालिकेनं सांगितलं आहे. मुलुंड परिसरात अवघे १४ खड्डे असल्याचा दावा आहे. मुंलुंडमध्ये ९८खड्डे असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील ८४ खड्डे भरले आहेत. 

पालिकेचा हा दावा विरोधी पक्षांनी खोटा असल्याचे म्हटले आहे. पालिकेनं खड्ड्यांसंबंधीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी केली. पालिकेनं खड्ड्यांसंबंधीची माहिती वेबसाइटवर सार्वजनिक करावी तसंच दर आठवड्याला स्थायी समितीच्या बैठकीत सुधारित आकडेवारी द्यावी. मुंबईत फक्त ४१४ तक्रारी असल्याचा दावा करत असले तरी त्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे, असंही ते म्हणाले. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पालिका प्रशासन खड्डे बुजवते. खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खड्डे बुजवणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. आतापर्यंत प्रशासनाने 84 ते 85 टक्के बुजवले आहेत. उरलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा बाईट
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.