ETV Bharat / city

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

author img

By

Published : Jan 3, 2020, 11:54 PM IST

घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथे एका 14 वर्षाच्या मुलीला निर्मनुष्य इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सलीम ऊर्फ बाबू शेख (वय-23) आरोपीला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

physical abuse case in ghatkopar
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मद्यपान करायला लावून लैंगिक अत्याचार

मुंबई - घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथे एका 14 वर्षाच्या मुलीला निर्मनुष्य इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सलीम ऊर्फ बाबू शेख (वय-23) आरोपीला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मद्यपान करायला लावून लैंगिक अत्याचार

काल (दि.2 जाने)ला रात्री सातच्या दरम्यान कामराजनगर मधील पीडित मुलगी आईसोबत कामराजनगर मधील बाजारात गेली होती. परंतु, बाजारात गर्दी जास्त असल्याने ती पुन्हा घराकडे एकटीच निघाली. रस्त्यात तिला आरोपी सलीम भेटला. संबंधित आरोपी याच विभागात वास्तव्यास असल्याने मुलगी त्याला ओळखत होती.

सलीमने घरी सोडण्याचे सांगून तिला नेताजी नगर या भागात नेले. यानंतर तिला 'भूत बंगला' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओसाड इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. त्याने या ठिकाणी मद्यपान करत पीडितेला देखील मद्यपान करायला सांगितले. परंतु मुलीने नकार दिला. त्यानंतर सलीमने मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलगी जोरात ओरडू लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तिची सुटका केली. आरोपी सलीमला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:पंतनगर येथे अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मद्यपान करायला लावून लैंगिक अत्याचार आरोपीस अटक

मुंबईतील घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथे एका 14 वर्षाच्या मुलीला निर्मनुष्य इमारतीत नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सलीम ऊर्फ बाबू शेख वय 23 असे या नराधमाचे नाव आहेBody:पंतनगर येथे अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मद्यपान करायला लावून लैंगिक अत्याचार आरोपीस अटक

मुंबईतील घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथे एका 14 वर्षाच्या मुलीला निर्मनुष्य इमारतीत नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सलीम ऊर्फ बाबू शेख वय 23 असे या नराधमाचे नाव आहे.

काल रात्री 7 वाजता कामराज नगर मधील पीडित मुलगी तिच्या आई सोबत कामराज नगर मधील बाजारात भाजीपाला आणण्यास गेली होती. परंतु बाजारात गर्दी जास्त असल्याने ती पुन्हा घराकडे एकटीच निघाली. रस्त्यात तिला आरोपी सलीम भेटला. त्यांच्याच विभागात रहात असल्याने मुलगी सलीमला ओळखत होती. सलीम ने तिला तुझा घरी सोडतो सांगून तिला कामराज नगरच्या शेवटी असलेल्या नेताजी नगर मधील 'भूत बंगला' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओसाड इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. त्या ठिकाणी त्याने मद्यपान करीत त्या मुलीला देखील मद्यपान करायला सांगितले. परंतु मुलीने त्यास नकार दिला. त्यानंतर सलीम ने तिला मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवत तिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलगी जोर जोरात ओरडू लागली.तेव्हा काही आजू बाजूच्या नागरिकांनी तिची सुटका केली.आरोपी सलीम ला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या अधिक तपास पंतनगर पोलीस करीत आहेत.
Byte: सुहास कांबळे(वरिष्ठ पोलीस निरीक्षक- पंतनगर पोलीस ठाणे)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.