ETV Bharat / city

बिनोय कोडीएरी यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर

बिनोय कोडीएरी यास दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

author img

By

Published : Jul 3, 2019, 11:33 PM IST

बिनोय कोडीएरी

मुंबई - केरळ राज्यातील सीपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात ओशिवरा पोलिसांनी एका 33 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबईतील दिंडोशी कोर्टात बिनोय याच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीत बिनोय कोडीएरी यास दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

न्यायालयाने जरी बिनोयला अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी त्यास आठवड्यातील प्रत्येक सोमवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात महिनाभर हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पोलिसांना तपासत सहकार्य करावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण -

दुबई मधील एका डान्स बारमध्ये ही महिला बिनोयच्या संपर्कात आली. दोघांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर बिनोयने आपण अविवाहित असून आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास लग्न करू असे पीडितेला सांगितले. बिनोय च्या भूलथापांना बळी पडलेल्या पीडितने २००९ पासून २०१५ पर्यंत बिनोय सोबत शरीर संबंध ठेवले. ज्यात त्यांना अपत्य झाले.

बिनोय पिडितेला घर खर्चासाठी पैसे देत होता. मात्र, २०१५ सालापासून दुबईतील बांधकाम व्यवसायात तोट्यात असल्याचे कारण देत त्याने पीडितेला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पीडितेने बोनोयला लग्न करण्यास सांगितले. या दरम्यान पीडितेच्या घरच्यांना बिनोय भेटत होता. मात्र, पीडितेला स्वतःच्या घरच्यांशी ओळख करून देत नव्हता. बिनोय याच्या सोशल माध्यमांवरील माहितीवरून तो अगोदरच विवाहित असून त्यास २ मुले असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. पीडितेने ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Intro:केरळ राज्यातील सिपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या ओशिवरा पोलिसांनी एका 33 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर या संदर्भात मुंबईतील दिंडोशी कोर्टात बिनोय कोडीएरी याच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती ज्यात बुधवारच्या सुनावणीत बिनोय कोडीएरी यास दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बिनोय कोडीएरी यास आठवड्यातील प्रत्येक सोमवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात महिनाभर हजेरी द्यावी लागणार असून पोलिसांना तापासत सहकार्य करावे लागणार आहे.
Body:काय आहे प्रकरण

या प्रकरणातील 33 वर्षीय पीडित महिला बिनोय कोडीएरी याच्या संपर्कात दुबई मधील एका डान्स बार च्या माध्यमातून आली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आपण अविवाहित असून आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास लग्न करू अस बिनोय पीडित महिलेला सांगत असे. बिनोय च्या भूलथापांना बळी पडलेल्या पीडित महिलेने 2009 पासून 2015 पर्यंत बोनोय सोबत शरीर संबंध ठेवले होते ज्यात त्यांना अपत्य झाले होते. मात्र 2015 सालापासून दुबईतील बांधकाम व्यवसायात तोटा होत असल्याचे कारण देत बिनोय याने पीडित महिलेला पैसे देण्यास नकार दिला असता सदर पीडितेने बोनोयला कडे लग्न करण्यास सांगितले. या दरम्यान पीडितेच्या घरच्यांना बिनोय भेटत होता मात्र पीडितेला स्वतःच्या घरच्यांशी ओळख मात्र करून देत नव्हता. बिनोय याच्या सोशल माध्यमांवरील माहितीवरून तो आगोदरच विवाहित असून त्यास दोन मुलं असल्याचे पीडितेच्या लक्षात आले.

या प्रकरणी वेळोवेळी लग्नाचा तगादा लावूनही आरोपी लग्न करीत नसून खर्चास पैसे देत नसल्याने सदर पीडित महिलेने ओशिवरा पोलिसांकडे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.